सध्या सोशल मीडियावर क्रिकेटविश्वातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतची आठवण येऊ शकते. हा व्हिडिओ बुधवारी यूरोपीयन क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये हंगेरी विरुद्ध रोमानिया सामन्यातील आहे. या सामन्यात रोमानियाचा फलंदाज पावेल फ्लोरिनने असे काही केले आहे, ज्यामुळे त्याने सर्वांचे लक्ष आकर्षित केले आहे आणि तो चर्चेचा विषय ठरत आहे.
रोमानियाचा फलंदाज फ्लोरिन यापूर्वी एकदा त्याच्या विचित्र हावभावांमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्या गोलंदाजीचा एक व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्याच्या फलंदाजीचा हा नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ यूरोपीयन चॅम्पियनशिपमधील आहे. रोमानिया संघासाठी फ्लोरिन ११ व्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. आपल्या खेळीदरम्यान त्याने एक चौकारदेखील मारला. फ्लोरिनचा हा टूर्नामेंटमधील पहिलाच चौकार होता, त्यामुळे तो अतिउत्साहात दिसला.
फ्लोरिनने ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर हा चौकार मारला होता. त्याने मारलेला चेंडू जेव्हा सीमारेषेच्या बाहेर जातो, तेव्हा फ्लोरिन आनंद व्यक्त करताना दिसतो आहे. चौकार मारल्यांतर तो त्याच्या एका गुडघ्यावर बसला आणि त्याची बॅट हवेत जोरजोरात फिरवू लागतो. त्याने ज्याप्रकारे हा आनंद व्यक्त केला आहे, तो भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीशांप्रमाणेच म्हणावा लागेल. श्रीशांतने २००६-०७ मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध अशाच प्रकारे आनंद व्यक्त केला होता.
it's my first boundary
in the European Cricket Championship so a celebration is needed !!! @EuropeanCricket #cricket pic.twitter.com/CQI4bRNSib— Pavel Florin (@PavelFlorin13) September 22, 2021
ही घटना त्यावेळची आहे जेव्हा भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर गेला होता. जोहान्सबर्गमध्ये मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा गोलंदाज आद्रे नेलने श्रीशांतवर बाउंसरचा हल्ला केला होता. गोलंदाजी करताना त्याने श्रीशांतवर काही कमेंटही केली होती. यानंतर श्रीशांत चिडला होता आणि त्याने पुढच्याच चेंडूवर षटकार मारला आणि आनंद व्यक्त करू लागला होता. नेलला चिडवण्यासाठी श्रीशांतने त्यावेळी अशाच प्रकारे त्याची बॅट फिरवली होती. या सामन्यात श्रीशांतने ८ विकेट्स घेतले होते आणि त्यामुळे हा सामना अनेकांच्या स्मरणात राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेविरुद्धच्या एका अर्धशतकाने कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रमांची नोंद
आज रंगणार आयपीएल उत्तरार्धातील पहिले ‘डबल हेडर’; युवा राजस्थानसमोर अनुभवी दिल्लीचे आव्हान
सीएसके ऑन टॉप! ३५ सामन्यानंतर अशी आहे आयपीएल २०२१ ची गुणतालिका