---Advertisement---

फुटबॉलचा बादशाह रोनाल्डो ‘या’ दिवशी होणार निवृत्त; स्वतः दिली माहिती

On: बुधवार, सप्टेंबर 21, 2022 10:54 PM
Cristiano-Ronaldo
---Advertisement---

पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्या निवृत्तीबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. गेल्या दोन दशकांपासून फुटबॉल जगतावर राज्य करणाऱ्या रोनाल्डोने आपण निवृत्ती केव्हा घेणार याबाबत एका कार्यक्रमात बोलताना आपली भूमिका ठेवली.

निवृत्तीचा प्रश्न विचारला असता रोनाल्डो म्हणाला, “सध्या माझा निवृत्तीचा कोणताही विचार नाही. या वर्षी कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर 2024 मध्ये होणाऱ्या युरो कपमध्ये खेळण्याची इच्छा असून, त्यानंतर निवृत्तीचा विचार करणार आहे. सध्या 37 वर्षांचा असलेला रोनाल्डो पुढे म्हणाला, ”माझा प्रवास अजून संपलेला नाही. तुम्हाला आणखी काही काळ ‘ख्रिससोबत रहावे लागेल. मला विश्वचषक आणि युरो कपचा भाग व्हायचे आहे. मला सध्या खूप ऊर्जावान वाटतेय.”
युरो २०२४ स्पर्धेपर्यंत रोनाल्डो ३९ वर्षांचा होईल. सध्या मॅंचेस्टर युनायटेडसाठी खेळणारा रोनाल्डो याचा समावेश जगातील सर्वकालीन महान फुटबॉलपटूंमध्ये होते.

वय आणि खेळ यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो, असे रोनाल्डोने यापूर्वी म्हटलेले. तो म्हणालेला, ‘वय हा फक्त एक आकडा आहे. 35-36 वर्षाचे वय झाले म्हणजे तुमची कारकीर्द संपली असे होत नाही. माझा फॉर्म आणि फिटनेस मी माझ्या खेळाने सिद्ध करू शकतो.’
कतार येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत रोनाल्डो पोर्तुगालकडून खेळताना दिसेल. कतारमध्ये यंदाच्या फिफा विश्वचषकात त्याने सहभाग नोंदवला तर, ही त्याची 10 वी मोठी स्पर्धा असेल. पोर्तुगालने अद्याप एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---