विलार पेरोसा येथे झालेल्या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डोने जुवेंट्सकडून खेळताना त्याच्या पहिल्याच सामन्यात ८व्या मिनिटाला गोल केला. जुवेंट्स विरूद्ध जुवेंट्स बी या सामन्यात त्याने हा गोल केला.
हा मैत्रीपूर्व सामना जुवेंट्सने ५-०ने जिंकला. ट्रान्सफर विंडो आणि रशियात झालेल्या फिफा विश्वचषकानंतर रोनाल्डो प्रथमच खेळत होता.
तर दुसऱ्या गोलमध्येही रोनाल्डोने त्याचा सहभाग नोंदवला. यावेळी त्याने जुवेंट्स बीच्या रिकार्डो कॅपेलीनीला स्वंय गोल करण्यास भाग पाडले.
The moment @Cristiano scored his first ⚪⚫ goal! ⚽️🔥😍#VillarPerosa #CR7Juve pic.twitter.com/o0ilL4WxoA
— JuventusFC 🇬🇧🇺🇸 (@juventusfcen) August 12, 2018
“आमच्यासाठी चॅम्पियन्स लीगचे चषक आण”,असे स्टेडियममधील चाहते ओरडत होते. तर एक चाहता सामन्याच्या ४५व्या मिनिटाला रोनाल्डोला आंलिगन देण्यासाठी मैदानात आला.
तसेच यावेळी पाउलो देबलाने ३१व्या आणि ४०व्या मिनिटाला गोल केल्यावर जुवेंट्स पहिल्या सत्रात ४-० असे पुढे होते. तर क्लाउडियो मॅर्किझियोने ५४व्या मिनटाला गोल केल्यावर सामना ७०व्या मिनिटाला संपला.
या दोन संघामध्ये १९५५पासून सामने होत आहेत. यातील पहिला सामना जुवेंट्स बीने ३-२ असा जिंकला होता. मात्र २००५चा सामना जिंकल्यानंतर त्यांना जुवेंट्सला पराभूत करता आले नाही.
या सामन्यात रोनाल्डो बरोबरच इम्रे कॅन आणि लियोनार्दो हे पण होते. यानंतर रोनाल्डो इटलीच्या सेरी ए या स्पर्धेत खेळणार असून ही स्पर्धा १८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यामध्ये जुवेंट्स विरुद्ध चायवो असा पहिला सामना असणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–मेस्सीने बार्सिलोनासाठी केला हा मोठा पराक्रम
–एशियन गेम्स कबड्डीत मोठी कामगिरी करण्यासाठी डार्कहॉर्स दक्षिण कोरिया सज्ज