fbpx
Monday, January 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्या बात! मेजर ध्यानचंद यांच्या बायोपिकची झाली घोषणा; निर्मात्याची ट्विटरवरून माहिती

हॉकीचे जादूगार म्हटले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या बायोपिकची घोषणा रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे आहे.

December 15, 2020
in टॉप बातम्या, हॉकी
0
Photo Courtesy: Twitter/@DhyanChandMajor

Photo Courtesy: Twitter/@DhyanChandMajor


सध्या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट काढण्याचे प्रमाण वाढले आहे. भारताचे सर्वकालीन महान धावपटू मिल्खा सिंग, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन व एमएस धोनी, हॉकी खेळाडू संदीप सिंग या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट बनवले गेले आहेत. आता, हॉकीचे जादूगार म्हटले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. इश्किया व सोनचिडीया यांसारखे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित करणारे अभिषेक चौबे या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील.

रॉनी स्क्रूवाला यांनी दिली माहिती
बॉलीवूडमधील प्रख्यात चित्रपट निर्माता असलेल्या रॉनी स्क्रूवाला यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ध्यानचंद यांच्या जीवनावरील चित्रपटाची घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘१,५०० हून अधिक गोल, तीन ऑलिंपिक सुवर्णपदके आणि भारताच्या अभिमानाची कहाणी. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, अभिषेक चौबे यांच्यासोबत मिळून आम्ही हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावरील चित्रपट बनवत आहोत.’
रॉनी स्क्रूवाला यांनी यापूर्वी रंग दे बसंती, उरी : द सर्जिकल स्ट्राइक यांसारखे मोठे चित्रपट निर्माण केले आहेत. प्रो कबड्डी लीगमधील यु मुंबा संघाची त्यांच्याकडे मालकी आहे. तसेच, अल्टिमेट टेबल-टेनिस लीगमध्ये देखील त्यांच्या मालकीचा संघ खेळत असतो. सदर चित्रपटाच्या चित्रीकरणास २०२१ मध्ये सुरुवात होऊन, चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. इश्किया आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या सोनचिडिया चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अभिषेक चौबे या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील.

भारताचे आजवरचे सर्वात्कृष्ट खेळाडू आहेत ध्यानचंद
मेजर ध्यानचंद यांना जगातील तसेच भारतातील आजवरचे सर्वोत्कृष्ट हॉकीपटू मानले जाते.त्यांना हॉकीचे जादूगार अशी उपाधी दिली गेली आहे. ध्यानचंद यांनी आपल्या कारकीर्दीत भारताला १९२८ ॲम्स्टरडॅम ऑलिंपिक, १९३२ लॉस ऐंजिलीस ऑलिंपिक व १९३६ बर्लीन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर यानेदेखील ध्यानचंद यांच्या खेळाची प्रशंसा केली होती. ध्यानचंद यांच्या नावे आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये १८५ सामन्यात विश्वविक्रमी ५७० गोलची नोंद आहे. ध्यानचंद यांच्याच जन्मदिनी भारतात राष्ट्रीय क्रीडादिवस साजरा केला जातो.

महत्वाच्या बातम्या:
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून स्टिव्ह स्मिथ बाहेर? या कारणामुळे अर्ध्यातून सोडले सराव सत्र
– नव्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीयांची बल्ले-बल्ले; सहा खेळाडू टॉप टेन मध्ये


Previous Post

सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात ‘या’ ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे पुनरागमन, २०१६ला जिंकून दिलीय ट्रॉफी 

Next Post

अख्खा पब्लिक जानता है कौन आने वाला है..! रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्सचा वर्षाव

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाचा गेली ३ दशके ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रम टीम इंडिया मोडणार का?

January 18, 2021
Screengrab: Twitter/ cricketcomau
क्रिकेट

व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला….

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

यावर्षी आशिया कप स्पर्धा भारताविनाच? ‘या’ कारणामुळे माजी विजेत्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता

January 18, 2021
Next Post
Photo Courtesy: MS File Photo

अख्खा पब्लिक जानता है कौन आने वाला है..! रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्सचा वर्षाव

Photo Courtesy: Twitter/ ICC

"बुमराह एकटाच मालिकेत फरक निर्माण करू शकतो", ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली स्तुती

Photo Courtesy: Twitter/ ICC

नववर्षात वेस्ट इंडिज करणार बांगलादेशचा दौरा, 'या' कारणामुळे टी२० मालिका रद्द

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.