न्यूझीलंडचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज रॉस टेलर याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या टेलरने नुकतेच आपले ‘रॉस टेलर: ब्लॅक अँड व्हाईट’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक काहीसे वादग्रस्त ठरताना दिसतेय. कारण, या पुस्तकातून त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बऱ्याच खळबळजनक खुलाशानंतर त्याने आयपीएलमधील दिल्ली डेअरडेविल्स संघाचे संघमालक किरण कुमार ग्रांधी यांच्याबाबत महत्त्वाचा किस्सा सांगितला.
रॉस टेलर हा आयपीएलच्या सुरुवातीचे तीन वर्ष रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी खेळला होता. त्यानंतर एक वर्ष राजस्थान रॉयल्स व पुढील दोन वर्ष दिल्ली डेअरडेविल्ससाठी त्याने आपले कौशल्य दाखवले. २०१२ आयपीएल हंगामा वेळीची एक गोष्ट लिहताना त्याने लिहिले,
“आयपीएल २०२२ वेळी संघातील बरेचसे खेळाडू ताजमहलला भेट देण्यासाठी इच्छुक होते. दिल्ली ते आग्रा हा प्रवास चार तासांचा होता. मात्र, त्यानंतर आठ तासांनी आमचा सामना होणार होता. परंतु, संघाचे संघमालक किरण कुमार ग्रांधी यांनी दोन प्रायव्हेट जेटने आम्हा ११ जणांना ताजमहलची सफर घडवून आणली. हा एक आनंददायी अनुभव होता.”
टेलर संघाचा भाग असताना दिल्लीने त्या हंगामात प्ले ऑफ्सपर्यंत धडक मारली होती. मात्र, केकेआर विरुद्ध पराभव झाल्यानंतर त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागलेले.
याच पुस्तकात टेलरने लिहिले होते की, आपण न्यूझीलंडसाठी खेळत असताना आपल्यावर संघात वांशिक टिप्पणी केली जायची. तसेच, २०११ आयपीएल वेळी राजस्थान रॉयल्स संघाच्या संघमालकांनी आपल्या कानशिलात लगावल्याचे खळबळजनक आरोप केले आहेत. या पुस्तकातून आणखीन काही मोठ्या गोष्टी उजेडात येऊ शकतात असादेखील अंदाज वर्तवला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारने चहलच्या बायकोसोबत शेअर केला फोटो, कॅप्शन लिहीत ‘युझी’ला केलं ट्रोल
आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या ‘या’ तिकडीपासून टीम इंडियाला धोका