न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार राॅस टेलर सध्या कारकिर्दीतील सर्वात्तम फाॅर्ममध्ये आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये हा ३४ वर्षीय खेळाडू रोज नवनवीन विक्रम करत आहे.
आज बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातही टेलरने ८२ चेंडूत शानदार ६९ धावांची खेळी केली. यात ७ चौकारांचा समावेश होता. हा सामना न्यूझीलंडने तब्बल ८८ धावांनी जिंकला.
याच सामन्यात तो न्यूझीलंडकडून वनडे कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. २१८ वनडे सामने खेळलेल्या टेलरने ४८.३२च्या सरासरीने ८०२६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २० शतके आणि ४७ अर्धशतकांचा समावेश आहे.
यापुर्वी हा विक्रम माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगच्या नावावर होता. फ्लेमिंगने २७९ सामन्यात ८००७ धावा केल्या होत्या.
वनडेत वेगवान ८ हजार धावा कऱणारा टेलर हा विराट कोहली, एबी डिव्हीलिर्स आणि सौरव गांगलीनंतरचा चौथा खेळाडू ठरला आहे.
न्यूझीलंडकडून वनडेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
८०२६- राॅस टेलर, सामने- २१८
८००७- स्टिफन फ्लेमिंग, सामने- २७९
७०९०- नॅथन अॅस्टल, सामने- २२३
६४४०- मार्टीन गप्टील, सामने- १६९
६०८३- ब्रेंडन मॅक्क्युलम, सामने- २६०
५५५४- केन विलियम्स, सामने- १३९