सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 ते 6 जानेवारी दरम्यान पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने मोठा विक्रम केला आहे.
तो या सामन्यात दुसऱ्या डावात 22 धावांवर बाद झाला. पण असे असले तरी तो आता न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने हा पराक्रम करताना स्टिफन फ्लेमिंगला मागे टाकले आहे.
टेलरचे आता कसोटीमध्ये 99 सामन्यात 46.28 च्या सरासरीने 7174 धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या 19 शतकांचा आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. फ्लेंमिंगने कसोटीमध्ये 111 सामन्यात 7172 धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे कसोटीमध्ये न्यूझीलंडकडून 7000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे सध्या केवळ फ्लेमिंग आणि टेलर हे दोनच क्रिकेटपटू आहेत.
टेलरसाठी आजचा दिवस खास ठरला असला तरी मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सामन्यात न्यूझीलंडला आज 279 धावांनी पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे ही कसोटी मालिकाही 3-0 अशी गमवावी लागली.
वनडेमध्येही टेलरच्याच सर्वाधिक धावा –
याचवर्षी फेब्रुवारीमध्ये टेलरने वनडेमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत फ्लेमिंगला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला होता. टेलरच्या वनडेत 8376 धावा आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या फ्लेमिंगच्या 8007 धावा आहेत.
तसेच न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17000 पेक्षा अधिक धावा करणारा टेलर हा एकमेव क्रिकेटपटू आहे.
न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
7174 – रॉस टेलर
7172 – स्टेफन फ्लेमिंग
6453 – ब्रेंडन मॅक्यूलम
6379 – केन विलियम्सन
5444 – मार्टिन क्रो
ROSS TAYLOR ➞ 7174*
Stephen Fleming ➞ 7172
Brendon McCullum ➞ 6453
Kane Williamson ➞ 6379
Martin Crowe ➞ 5444Taylor is now New Zealand's highest run-scorer in Tests! 🙌#AUSvNZ | @BLACKCAPS pic.twitter.com/8qxmjFIXaQ
— ICC (@ICC) January 6, 2020
सामना झाला नाही पण भारतीय जुगाडाची झाली सगळीकडेच चर्चा
वाचा👉https://t.co/nlqu4bDWqG👈@BCCI #म #मराठी #Cricket #INDvSL— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020
वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी
वाचा👉https://t.co/gKcdOcVpct👈#म #मराठी #Cricket #HappyBirthdayKapilDev @therealkapildev— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020