न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (Newzealand vs Bangladesh) या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने विजय मिळवला होता. तर दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चमध्ये सुरू आहे. हा कसोटी सामना न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) साठी खास आहे. कारण हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना आहे. दरम्यान या कसोटी सामन्यात त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
रॉस टेलरचा हा कसोटी कारकिर्दीतील ११२ वा सामना आहे. हा सामना खेळण्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच त्याने मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूची बरोबरी केली आहे. त्याने न्यूझीलंड संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या विक्रमात दिग्गज फिरकीपटू डॅनियल विटोरीची बरोबरी केली आहे. दोघांनी न्यूझीलंड संघासाठी ११२ कसोटी सामने खेळले आहेत. तसेच न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने १११ आणि ब्रेंडन मॅक्युलम १०१ कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.(most test matches played for newzealand)
व्हिडिओ पाहा-
रॉस टेलरने ३० डिसेंबर, २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. त्याने म्हटले होते की, बांगलादेश संघाविरुद्ध होणारी २ कसोटी सामन्यांची मालिका आणि ऑस्ट्रेलिया, नेदरलँड विरुद्ध होणारी ६ वनडे सामन्यांची मालिका झाल्यानंतर तो निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे बांगलादेश संघाविरुद्ध सुरू असलेला कसोटी सामना हा त्याच्यासाठी अत्यंत खास आहे.
या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानावर आल्यानंतर टाळ्याच्या गजरात त्याचे स्वागतही करण्यात आले आहे.
A special reception for a special player at Hagley Oval. @RossLTaylor heads to the middle for the first time in his last Test for New Zealand. Follow play LIVE with @sparknzsport. #NZvBAN pic.twitter.com/RZc78WaRr1
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 9, 2022
तसेच रॉस टेलरच्या कारकिर्दीबद्दल (Ross Taylor stats) बोलायचं झालं तर, त्याने २००६ मध्ये न्यूझीलंड संघासाठी पदार्पण केले होते. तो न्यूझीलंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७६५५ धावा केल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये त्याने ८५९१ धावा केल्या आहेत. तसेच रॉस टेलरच्या आणखी एका खास विक्रमाची नोंद आहे. तो एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने क्रिकेटच्या तीनही स्वरूपात १०० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Video: शेवटच्या कसोटीपूर्वी रॅास टेलर भावुक, राष्ट्रगीत सुरू असताना अश्रू अनावर
पंतवर टीकेचा भडिमार सुरूच! गावसकर, मदललाल यांच्यानंतर ‘हा’ दिग्गज संतापला
हे नक्की पाहा: