---Advertisement---

अंतिम लढतीपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचे भारताला ओपन चॅलेंज; सांगितले, तिसऱ्या कसोटीत का हरवणार?

On: सोमवार, जानेवारी 10, 2022 11:52 AM
dean-elgar
---Advertisement---

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका (india tour of South Africa) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने पुनरागमन करत ७ गडी राखून विजय मिळवला आहे. सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा आणि (Sa vs Ind 3rd test) अंतिम सामना हा निर्णायक सामना असणार आहे. या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघांना मालिका खिशात घालण्याची सुवर्णसंधी असणार आहे. दरम्यान हा सामना सुरू होण्यापूर्वी यजमान संघाने पाहुण्या संघाला चेतावणी दिली आहे.

दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार डीन एल्गरने (Dean Elgar statement) म्हटले की, “तिसरा कसोटी सामना हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. मला तर असे वाटते की, जर आम्ही हा सामना जोहान्सबर्ग कसोटीप्रमाणे खेळलो तर नक्कीच आम्ही हा सामना जिंकू. केपटाऊनमध्ये वेगवान गोलंदाज आमचे प्रिय मित्र असणार आहेत. मला आधीपासूनच पुढे येऊन संघाचे नेतृत्व करायचे होते. ही गोष्ट सोपी तेव्हा होते, जेव्हा खेळाडू तुमच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालत असतात. मला शेवटच्या कसोटी सामन्यात देखील माझ्या संघासाठी एक महत्वपूर्ण खेळी करायची आहे.”

व्हिडिओ पाहा- 

तसेच भारतीय संघाची केपटाऊनच्या मैदानावरील कामगिरी पाहिली तर, भारतीय संघाने १९९३ पासून ५ कसोटी सामने खेळले आहेत. या ५ सामन्यांपैकी ३ कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर २ सामने अनिर्णीत राहिले आहेत. तसेच २०१४ नंतर दक्षिण आफ्रिका संघाने या मैदानावर ७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना केवळ १ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात केपटाऊनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. वेगवान गोलंदाजांनी या मैदानावर एकूण १२४ गडी बाद केले आहेत. तर फिरकी गोलंदाजांनी ३४ गडी बाद केले आहेत. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघ कसोटी मालिका आपल्या नावावर करू शकतो.

महत्वाच्या बातम्या :

पंतवर टीकेचा भडिमार सुरूच! गावसकर, मदललाल यांच्यानंतर ‘हा’ दिग्गज संतापला

केपटाऊन कसोटीत भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ अविस्मरणीय कामगिरी, ज्या आजही विसरणे कठीण

हे नक्की पाहा:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---