विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल स्टेडियममध्ये पार पडला. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघामध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु न्यूझीलंड संघांतील गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी, भारतीय खेळाडूंना सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. विजयासाठी १३९ धावांची आवश्यकता असताना कर्णधार केन विलियमसनसोबत मिळून विजयी भागीदारी करणारा रॉस टेलर सामना झाल्यानंतर मुलाखतीत मात्र भावुक झाल्याचे दिसून आला.
न्यूझीलंड संघाला आयसीसी चषक मिळवण्यासाठी गेली अनेक वर्षे वाट पाहावी लागली आहे. २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत, न्यूझीलंड संघाने जवळजवळ विजय मिळवला होता. परंतु या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. त्यापूर्वी २०१५ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत देखील न्यूझीलंड संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला होता. त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर, अनुभवी रॉस टेलर सामन्यानंतर भावुक झाला होता. एवढेच नाही तर, मुलाखतीतदरम्यानही त्याचे आनंदाश्रू थांबत नव्हते. (Ross Taylor gets emotional after winning world test championship final)
मुलाखतीदरम्यान रॉस टेलरने म्हटले की, “मला तर अजूनही विश्वास होत नाहीये. परंतु हे गेल्या काही वर्षात होणारच होते. या सामन्यात भरपूर पाऊस पडला. आमचा संघ अडचणीत असताना देखील खेळाडूंनी जोरदार पुनरागमन केले आणि या सामन्यात विजय मिळवला. हा विजय मी कधीच विसरू शकत नाही. या सामन्यात आमच्यावर खूप दबाव होता यात काहीच शंका नाही. परंतु आम्ही परिस्थितीला अनुसार फलंदाजी केली.”
https://youtu.be/OxN5ECgAJ8c
टेलर आणि विलियमसन ठरले विजयाचे शिल्पकार
न्यूझीलंड संघाचा दुसरा डाव सुरू असताना भारतीय गोलंदाज केन विलियमसन आणि रॉस टेलरला बाद करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले होते. भारतीय संघाने न्यूझीलंड संघाससोर विजयासाठी १३९ धावांचे आव्हान ठेवले होते.या आव्हानाचा पाठलाग करताना, केन विलियमसनने ५२ तर रॉस टेलरने ४७ धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या –
सुवर्णसंधी गमावली! WTC अंतिम सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाचे ‘इथे’ही मोठे नुकसान
मैदानातील वैर विसरुन विजेता संघनायक केनने विराटला मारली मिठी, भारतीय चाहत्यांकडून भरभरुन कौतुक