---Advertisement---

राॅस द बाॅस- ३४ वर्षीय राॅस टेलरचा क्रिकेटमध्ये कहर कारनामा

On: मंगळवार, नोव्हेंबर 13, 2018 6:07 PM
---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ८० आणि नाबाद ८६ धावांच्या खेळामुळे न्यूझीलंडचा राॅस टेलर आयसीसी वन-डे क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आला आहे. त्याचे आयसीसी क्रमवारीत  ८०८ गुण झाले आहेत.

१२ वर्षांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या राॅस टेलरची ही कारकिर्दीतील सर्वात्तम कामगिरी आहे.

३ सामन्यांच्या पाकिस्तानविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत त्याने पहिल्या सामन्यात ८० तर दुसऱ्या सामन्यात ८६ धावांची खेळी केली. तर तिसरा सामना पावसामुळे वाया गेला.

टेलरच्या याच कामगिरीमुळे त्याने जो रुट आणि बाबर आझमला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.

सध्या वन-डे क्रमवारीत विराट कोहली ८९९ गुणांसह विराट अव्वल तर ८७१ गुणांसह रोहित दुसऱ्या स्थानावर आहे. राॅस टेलरचे ८०८ गुण असून केवळ १ गुणाच्या फरकामुळे जो रुट चौथ्या स्थानी फेकला गेला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment