---Advertisement---

रॉस टेलरचा कसोटी कारकीर्दीला ‘अविस्मरणीय’ अलविदा, अखेरच्या चेंडूवर घेतली विकेट, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, जानेवारी 11, 2022 5:54 PM
Ross Taylor
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाने जोरदार विजय मिळवला होता, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने जोरदार पुनरागमन करत १ डाव आणि ११७ धावांनी विजय मिळवला आहे. ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली. हा सामना रॉस टेलर याच्या (Ross Taylor) कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. दरम्यान, हा सामना त्याच्यासाठी आठवणीतील सामना ठरला आहे.

या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ५२१ धावांचा डोंगर उभारला होता. न्यूझीलंड संघाकडून टॉम लेथम (Tom Latham) आणि डेवोन कॉनवेने (Devon convey) महत्वपूर्ण खेळी केली होती. टॉम लेथमने दुहेरी शतकी खेळी करत २५२ धावांची खेळी केली होती. तर डेवोन कॉनवेने १०९ धावा केल्या होत्या. बांगलादेश संघाने दोन डावात फलंदाजी करून सुद्धा त्यांना इतक्या धावा करता आल्या नाही.( Ross Taylor retirement)

न्यूझीलंड संघाला या धावांचा पाठलाग करताना अवघ्या १२६ धावा करण्यात यश आले. त्यानंतर बांगलादेश संघाला फॉलो ऑन देण्यात आला होता. पहिल्या डावात न्यूझीलंड संघाकडून ट्रेंट बोल्टने ५, टीम साऊदीने ३ आणि काईल जेमिसनने २ गडी बाद केले होते. दुसऱ्या डावात जेव्हा बांगलादेश संघ फलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी देखील बांगलादेश संघातील फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. बांगलादेश संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २७८ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या डावात नील वॅगनर आणि काईल जेमिसनने ३-३ गडी बाद केले होते.

रॉस टेलरने शेवटच्या सामन्यात घेतला बळी 
इबादत हुसेन हा दुसऱ्या डावात बांगलादेश संघाकडून बाद होणारा शेवटचा फलंदाज होता. आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असलेल्या रॉस टेलरने त्याला बाद करत माघारी धाडले. न्यूझीलंड संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या रॉस टेलरने आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर गडी बाद करत आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट केला. एका क्रिकेटपटूसाठी यापेक्षा आणखी चांगला शेवट असूच शकत नाही.

https://twitter.com/btsportcricket/status/1480811140695396353

कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर गडी बाद करणारा रॉस टेलर हा जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी फक्त रिचर्ड हॅडली, ग्लेन मॅकग्रा आणि मुथय्या मुरलीधरन सारख्या दिग्गज गोलंदाजांनी ही खास कामगिरी केली होती.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1480772077699231745?s=20

तसेच सामना झाल्यानंतर रॉस टेलर म्हणाला की, ” देशाचे प्रतिनिधित्व करताना मला खूप आनंद झाला आहे. क्राईस्टचर्चमध्ये मी भरपूर सामने खेळलो आहे. कारकीर्दीचा शेवट करण्याचा एक चांगला मार्ग आहे.”

महत्वाच्या बातम्या :

जाणून घ्या : आयसीसीने डिसेंबरमध्ये एकाही महिला क्रिकेटपटूला ‘प्लेअर ऑफ दि मंथ’ पुरस्काराने का गौरवले नाही?

महानतेवर शिक्कामोर्तब! रॉस टेलरला अखेरच्या कसोटीत मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’; पाहा भावनिक व्हिडिओ

हे नक्की पाहा:

द्रविडला 'जॅमी' टोपणनाव पडलं तरी कसं? | Story behind Rahul Dravid Nickname JAMMY

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---