आतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रत्येक खेळाडूसाठी त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खास असतो. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉट टेलर (ross taylor) देखील त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश (new zealand vs bangladesh test series) यांच्यातील दुसरा कसोटी सामना रविवारी (९ जानेवारी) सुरू झाला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा रॉस टेलर फलंदाजीसाठी मैदानावर आला, तेव्हा एक सुंदर नजारा पाहायला मिळाला.
सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेचा बळी गेल्यानंतर रॉस टेलर फलंदाजीसाठी आला. त्याला पाहताच मैदानावरील प्रत्येक दर्शक स्वतःच्या जागेवर उभा राहिला आणि टेलरसाठी टाळ्या वाजवू लागला. टेलर फलंदाजीसाठी येताना संपूर्ण मैदानात टाळ्यांच्या कडकडाट ऐकू येत होता. क्षेत्ररक्षक करणारे बांगलादेशचे खेळाडू देखील टेलरला गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
असे असले तरी, टेलर त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात स्वतःची छाप पाडू शकला नाही. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात २८ धावा केल्या आणि विकेट गमावली. बांगलादेशच्या इबादत हुसनने टेलरची विकेट घेतली. टेलरसाठी कसोटी कारकिर्दीतील हा शेवटचा डाव असू शकतो. कारण, न्यूझीलंडने सामन्याच्या पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली आहे आणि बांगलादेशला पुन्हा एकदा फलंदाजीची संधी दिली जाऊ शकते. टेलर जर पुढच्या डावात फलंदाजीला आला नाही, तर कसोटी कारकिर्दीत त्याच्या नावावर ११२ कसोटींमध्ये ७६८३ धावा असतील. विकेट गमावल्यानंतर मैदानाबाहेर जाताना देखील प्रेक्षकांनी टेलरला अभिवादन दिले.
https://twitter.com/ESPNcricinfo/status/1480312207644651520?s=20
सामन्याचा विचार केला, तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने एका विकेटच्या नुकसानावर ३४९ धावांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने सहा विकेट्सच्या नुकसानावर ५२१ धावा केल्या आणि डाव घोषित केला. पहिल्या डावात टॉम लॅथमने सर्वाधिक २५२ धावा ठोकल्या. तसेच, कॉनवेने १०९ धावा केल्या.
प्रत्युत्तर, देण्यासाठी मैदानात आल्यानतंर बांगलादेश संघ मात्र स्वस्तात गुंडाळला गेला. बांगलादेशने सामन्याच्या पहिल्या डावात ४१.२ षटकात १२६ धावा केल्या आणि त्यांचा संपूर्ण संघ तंबूत परतला. बांगलादेशचे पहिले चार फलंदाज अवघ्या ११ धावांवर बाद झाले होते. त्यानंतर यासिर अलीने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंड संघ पहिला डाव संपल्यानतंर ३९५ धावांनी आघाडीवर आहे. आता तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड फलंदाजी करेल की, बांगलादेशला फॉलोऑन करण्याची संधी देईल हे पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
जमशेदपूरसमोर ईस्ट बंगालचे आव्हान
विजयी भव! केपटाऊन कसोटीत कर्णधार विराटची बॅट ओकणार आग, विजयासाठी टीम इंडियाची तयारी सुरू
तिसऱ्या कसोटीपूर्वी विराटची ‘झंझावाती’ पत्रकार परिषद! सर्व शंकांचे केले निरसन; वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –