---Advertisement---

न्यूझीलंडने सामना हरला पण रॉस टेलरच्या नावावर झाला हा मोठा विक्रम

On: सोमवार, फेब्रुवारी 3, 2020 12:52 PM
---Advertisement---

काल (2 फेब्रुवारी) माऊंट मॉनगनुई (Mount Maunganui) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना (5th And Last Match In T20 Series) पार पडला. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. तसेच मालिका 5-0 ने जिंकत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला.

असे असले तरी न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने (Ross Taylor) या सामन्यात एक विक्रम केला आहे.  2006 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टेलरने काल भारताविरुद्ध आपला 100 टी20 सामना खेळला. त्याने 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 1909 धावा केल्या. यामध्ये 7 अर्धशतकांचा समावेश आहे.

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा तो शोएब मलिक(Shoaib Malik) आणि रोहित शर्माRohit Sharma) नंतरचा केवळ तिसरा क्रिकेटपटू आहे. मलिकने 113 सामने खळले आहेत. तर रोहितने 108 सामने खेळले आहेत.

तसेच टेलर न्यूझीलंड संघाकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 सामने खेळणारा महिला क्रिकटपटू सुझी बेट्सनंतरचा दुसरा खेळाडू बनला आहे. सुझी बेट्सने 112 टी20 सामने खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे पुरुष खेळाडू-

113 सामने – शोएब मलिक

108 सामने – रोहित शर्मा

100 सामने – रॉस टेलर

99 सामने – शाहिद आफ्रिदी

98 सामने – एमएस धोनी

https://twitter.com/Maha_Sports/status/1223932611627646977

https://twitter.com/Maha_Sports/status/1223925136035729408

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---