---Advertisement---

रॉस टेलरने राजस्थाननंतर आरसीबीची केली पोलखोल

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 6:05 PM
Ross Taylor
---Advertisement---

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू रॉस टेलरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तरीही आजकाल तो चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामागचे कारण आहे त्याचे आत्मचरित्र. त्यामध्ये त्याने त्याच्या क्रिकेटमधील काही घटनांचा उल्लेख केला आहे. यामध्ये इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) देखील समावेश आहे. त्यामध्ये त्याने राजस्थान रॉसल्सशी निगडीत काही गोष्टीचा उल्लेख केला असून त्यावर प्रचंड वादळ उठले आहे. अशातच त्यातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी (आरसीबी) संबधित एक किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे.

रॉस टेलर (Ross Taylor) याने पॉल थॉमसने लिहीलेली त्याची रॉस टेलर-ब्लॅक एँड व्हाईट हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. यामध्ये त्याने त्याच्यासोबत घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करताना आरसीबीबाबत खंत व्यक्त करताना म्हटले, जर त्यांनी मला अधिक काळ संघात ठेवले असते, तर माझे आयपीएलमधील कारकिर्द मोठी झाली असती.

टेलर आयपीएलच्या पहिल्या हंगामात आरसीबीकडून खेळला. पदार्पणाच्या सामन्यातच मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना १२ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार फटकारत २३ धावा केल्या होत्या. त्याने २००८, २००९ आणि २०१० या दरम्यान आरसीबीकडून खेळताना २२ डावात २ अर्धशतकांच्या सहाय्याने ५१७ धावा केल्या आहेत. नंतर त्याला २०११च्या लिलावात राजस्थानने विकत घेतले. पुढे त्याने सात वर्षे आयपीएलच्या विविध संघात खेळताना चार वेगवेगळ्या फ्रॅंचायजींसाठी १००० पेक्षा अधिक धावा केल्या.

टेरलने म्हटले, “लाखो डॉलर कमावणे चांगले असते. मात्र आरसीबीने जर मला ९,५०,००० डॉलरमध्ये खरेदी केले असते तर उत्तम झाले असते. ते माझे आरसीबी सोबतचे चौथे वर्ष असले असते. जो खेळाडू एकाच फ्रॅंचायजीकडून अधिक वेळ खेळतो त्याचीच साथ ते देतात. यामुळे एका फ्रॅंचायजीच्या खेळाडूच्या रूपात माझी आयपीएलची कारकिर्द मोठी राहिली असती.”

“मी जर आरसीबीसोबतच खेळलो असतो तर मला वीरेंद्र सेहवाग, शेन वॉर्न, माहेला जयवर्धने आणि युवराज सिंग यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली नसती,” असेही टेरलने त्याच्या पुस्तकात लिहिले आहे.

आयपीएलमध्ये टेलरने ३ हंगाम आरसीबीकडून, त्यानंतर २०११ राजस्थान, २०१२ दिल्ली डेयरडेविल्स (दिल्ली कॅपिटल्स) आणि २०१३मध्ये पुणे वॉरियर्सकडून खेळला. तर २०१४मध्ये तो परत दिल्लीकडून खेळला. हे त्याचे शेवटचे आयपीएल ठरले. त्याने ५५ आयपीएल सामन्यातील ५४ डावांत २५.४३च्या सरासरीने १०१७ धावा केल्या. त्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘विराट कोहली टायगर वुड्स सारखा आहे’, सलग २ शतके झळकावणाऱ्या झिम्बाब्वेच्या खेळाडूने केले कौतुक

आशियाच्या रणांगणात ‘हे’ आहेत भारताचे ‘सिक्सर किंग’! दोन झाले रिटायर तर एकाला मोठी संधी

‘आमच्याकडे हार्दिक पांड्या असता तर…’, पाकिस्तानच्या दिग्गजाने केली खंत व्यक्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---