---Advertisement---

‘वाघ खूप आहेत, पण द्रविड एकच!’ आत्मचरित्रात रॉस टेलरने सांगितला भन्नाट किस्सा

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 4:10 PM
dravid-practice
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल एक अशी स्पर्धा आहे, ज्याठिकाणी भारतीय आणि विदेशी खेलाडूंमध्ये चांगली मैत्री होत असते. न्यूझीलंडचा माजी दिग्गज फलंदाज रॉस टेलर देखील २०११ साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळत होता. टेलरने त्याची आत्मकथा ‘रॉल टेलर: ब्लॅक एन्ड व्हाईट’ मध्ये काही मोठे खुलासे केले आहेत. भारतीय संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी दिग्गज राहुल द्रविड विषयी देखील टेलरच्या या पुस्तकातून काही मजेशीर किस्से समजले आहेत.

रॉस टेलर (Ross Taylor) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) राजस्थान रॉयल्सचे माजी खेळाडू आहेत. दोघेही संघासोबत एकत्र वाघ पाहण्यासाठी रणथंभौर नॅशनल पार्कमध्ये गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी सर्वसामन्य नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. टेलरच्या मते लोकांची उत्सुकता वाघाकडे पाहण्यापेक्षा द्रविडला पाहण्यात जास्त होती. टेलरने त्याच्या ‘ब्लॅक एन्ड व्हाईट’ आत्मकथेत हा मजेशीर किस्सा सर्वांसोबत शेअर केला आहे.

टेलरने आत्मकथेत खुलासा केला की, त्यांने द्रविडला प्रश्न विचारल होता, ज्यावर द्रविडने एक अनपेक्षित उत्तर दिले. द्रविड म्हणाला होता की, त्याने २१ वेळा जंगल सफारी केली आहे, पण एकदाही वाघ पाहता आला नाही. द्रविडच्या उत्तरामुळे टेलर विचारात पडला होता. परंतु तितक्यात त्यांच्या ड्रायवरला फोन आला आणि जवळच्याच लोकेशवर वाघ आढळल्याचे समजले. टेलरने सांगितल्याप्रमाणे द्रविडला त्याच्या २२ व्या जंगल सफारीमध्ये पहिल्यांदाच वाघ पाहायला मिळाला होता.

टेलरने  लिहिले आहे की, “आम्ही जंगलातील दुसऱ्या गाड्यांच्या शेजारी जाऊन थांबलो होतो. लॅन्ड रोव्हरपेक्षा एका मोठ्या एसयूव्हीचा वरचा भाग खोललेला होता. वाघ एका खडकावर उभा होता, आम्ही सुमारे १०० मीटर लांब होतो. आम्ही जंगलात वाघाला पाहण्यासाठी उत्सुक होतो. पण दुसऱ्या गाड्यांमधील लोकांनी तत्काळ द्रविडकडे त्यांचे कॅमेरे फिरवले. द्रविडला पाहण्यासाठी ते तितकेच उत्सुक होते, जितके आम्ही वाघ पाहण्यासाठी होतो. जगात शक्यतो ४ हजारांपेक्षा जास्त वाघ आहेत, पण राहुल द्रविड एकच आहे.”

दरम्यान, टेलर २००८ ते २०१० मद्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी आयपीएल खेळला होता. त्यानंतर २०११ हंगामात त्याने राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. त्याची आत्मकथा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. त्याने यामध्ये अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे न्यूझीलंडसाठी खेळताना त्याला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला, असा आरोप त्याने केला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

ZIMvsIND: राहुलने गाजवलेलं झिम्बाब्वेविरुद्धच पदार्पण, आता कॅप्टन म्हणून मिळवणार पहिला विजय?

Asia Cup 2022 | भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू आहे कारण

‘तो फॉर्मात परतला तर…’ पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने आपल्याच संघाला दिलाय इशारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---