आजवर क्रिकेट क्षेत्रातून बऱ्याचदा क्रिकेटपटूंना वर्णद्वेषाला सामोरे जावे लागल्याच्या बातम्या आल्या आहेत. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू रॉस टेलर यानेही आपल्या बायोग्राफीत न्यूझीलंड क्रिकेटमधील वर्षद्वेषाबद्दल खुलासा केला आहे. ‘रॉस टेलर ब्लॅक अँड व्हाईट’ नावाच्या आपल्या बायोग्राफीत टेलरने न्यूझीलंडमध्ये क्रिकेट एक पारदर्शक खेळ असल्याचे म्हटले आहे. परंतु त्याला बऱ्याचदा ड्रेसिंग रूममध्ये वर्षद्वेषाचा अनुभव आल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचे काही संघ सहकारी त्याला ‘बंटर’ म्हणून हाक मारत असे.
आपल्या बायोग्राफीत (Ross Taylor) वर्णद्वेषाबद्दल (Roos Taylor On Racism) बोलताना टेलर म्हणाला की, “न्यूझीलंडमध्ये क्रिकेटला एक चांगला खेळ मानले जाते. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मी अधिकतर एक वेगळा खेळाडू राहिलो आहे. गोऱ्या लोकांमध्ये एक सावळा खेळाडू. यामुळे बऱ्याचशा आव्हानांना सामोरे जावे लागते, जे तुमच्या संघ सहकाऱ्यांना किंवा इतर लोकांना जाणवत नाही. कारण क्रिकटमध्ये पोलिनेशियन समुदायाचे प्रतिनिधित्त्व करणारे खेळाडू फार कमी आहेत. परंतु मला कधीही नवल नाही वाटायचे, जेव्हा लोक मला माओरी किंवा भारतीय समजत असायचे.”
“माझ्या एका सहकाऱ्याने एकदा मला म्हटले होते की, रॉस तू अर्धा चांगला व्यक्ती आह. परंतु कोणता अर्धा चांगला व्यक्ती होतो?, हे मी तुला सांगू शकत नाही. पण मला समजले होते की, त्याला मला काय म्हणायचे होते. माझ्याबरोबरच न्यूझीलंड संघातील काही अन्य खेलाडूंनाही वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागत असे,” असेही त्याने म्हटले.
"We didn't have a very good captaincy relationship." 🗣️
Ross Taylor reveals all in this exclusive interview ahead of the release of his book "Ross Taylor: Black & White". Catch the full interview tonight on Sky Sport 1 at 5pm and again at 7pm on Sky Sport 3. #SkySportNZ pic.twitter.com/Yj1QSS8n2C
— Sky Sport NZ (@skysportnz) August 11, 2022
पुढे बोलताना टेलरने सांगितले की, न्यूझीलंडमध्ये अधिकतर गोऱ्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळते. तो म्हणाला की, “बऱ्याचदा असे होते, जेव्हा मी खराब फटका खेळलो, तेव्हा त्यावरून अतिशय घाण शब्द वापरले जात असायचे. पण हेच, संघातील इतर कोणत्या खेळाडूने असाच फटका मारला तर, त्याला कोणीही असे शब्द वापरत नसे. थोडक्यात, मी खराब फटका मारल्यास मला अभद्र शब्दात फटकारले जायचे आणि इतरांना फक्त खराब फटक्याची निवड म्हणून हिणवले जायचे.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा