Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रॉस टेलरने दिली टीम इंडियाला कसोटी मालिकेपूर्वी चेतावणी; म्हणाला…

November 22, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
ross-taylor

Photo Courtesy: Twitter/ICC


न्यूझीलंड संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका नुकतीच पार पाडली आणि भारताने ३-० च्या फरकाने ही मालिका जिंकली. यानंतर उभय संघात २५ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना कानपूरमध्ये खेळला जाईल. तत्पूर्वी, न्यूझीलंड संघाचा दिग्गज खेळीडू रॉस टेलरने या कसोटी मालिकेविषयी मोठे विधान केले आहे. रॉस यापूर्वी भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्ध्येचा अंतिम सामना खेळला होता, त्यानंतर रॉसने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आता तो भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी तयार आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार रॉस म्हटला आहे की, यावेळी आम्ही एका अंडरडॉग संघाप्रमाणे नाही, तर चॅम्पियनप्रमाणे भारतात खेळायला येत आहोत. तत्पूर्वी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत करून जेतेपद मिळवले होते. रॉसने असेही सांगितले आहे की,  आम्ही हे मानतो की, जिंकण्यासाठी भारत एक कठीण जागा आहे. मात्र, आम्ही सुरुवात श्रीलंकेमधून केली होती. त्याठिकाणी मालिका अनिर्णीत करण्यात यशस्वी ठरलो. येणारी दोन वर्ष न्यूझीलंड क्रिकेटसाठी खूप चांगली राहणार आहेत.

न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार रॉस टेलर मागच्या जवळपास दोन वर्षापासून मर्यादित षटकांच्या संघातून बाहेर आहे. अशात भारताविरुद्ध कसोटी मालिकेत चांगले प्रदर्शन करून संघाता स्थान कायम ठेवण्यासाठी त्याच्यावर दबाव असेल. न्यूझीलंड संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सामन्यांसाठी भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड या देशांचा दौरा करायचा आहे. तसेच बांगलादेश, श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका संघांसोबत मायदेशात खेळायचे आहे. रॉसकडे यापूर्वी भारतात कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने २०१०, २०१२ आणि २०१६ मध्ये भारताचा दौरा केला होता.

रॉसने आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकूण १५ कसोटी सामने भारताविरुद्ध खेळले आहेत.  या सामन्यांमध्ये त्याने ३४.८० च्या सरासरीने ८७० धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध त्याने आतापर्यंत तीन कसोटी शतक केली आहेत. त्याने भारतात खेळलेल्या कसोटी सामन्यांचा विचार केला तर त्यांची संख्या ८ आहे. या ८ सामन्यांमध्ये रॉसची सरासरी धावसंख्या २५ होती. त्याने भारताता खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये एक शतक देखील केले आहे. हे शतक त्याने २०१२ साली बेंगलोरमध्ये केले होते. भारताने या सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला होता.


Next Post
Sourav Ganguly

तीन दिग्गज कर्णधार, ज्यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली संघाला सलग तीन आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहचवलं

suryakumar-yadav

सूर्यकुमारचा झाला कसोटी संघात समावेश? कानपूरमध्ये करू शकतो पदार्पण

ravi-shastri

शास्त्री गुरुजींचे मोठे विधान; "माझ्या कार्यकाळात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या असत्या, मात्र..."

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143