---Advertisement---

हा खेळाडू म्हणतो,’…तर मी २०२३ विश्वचषक खेळण्यास तयार’

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2020 12:56 PM
---Advertisement---

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने 2023मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकात खेळण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, तो संघात स्थान मिळविण्यास सक्षम आहे की नाही याचा निर्णय पुढील वर्षाच्या अखेरीस होईल. हा निर्णय त्याची खेळण्याची पद्धत, त्याची तंदुरुस्ती आणि खेळातून येणाऱ्या प्रेरणेवर आधारित असेल.

21 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 2 सामन्यांच्या कसोटी (2 Matches of Test Series) मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील वेलिंग्टन येथे होणारा पहिला कसोटी सामना 35 वर्षीय टेलरचा 100वा कसोटी सामना असेल. याचबरोबर तो तिन्ही स्वरूपात 100 सामने पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू बनेल.

टेलर stuff.co.nzशी बोलताना म्हणाला की, “मी याला (2023मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकात खेळण्याच्या शक्यतेस) नकार देणार नाही. पण, मला वाटते की, मला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे. मी सध्या पुढच्या वर्षाचा विचार करत आहे. यावेळी होणाऱ्या टी20 विश्वचषक आणि घरगुती हंगामामुळे मला माझ्या क्षमतेविषयी कळेल.” 

“मी स्वत:ला खेळण्यासाठी प्रेरित करू शकेल का? मी चांगला खेळू शकेल का? यादरम्यान मी तंदुरूस्त राहील का? आणि मी संघात स्थान मिळवण्यासाठी पात्र असेल का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरे हो असतील तर, 2023 माझ्यासाठी एक पर्याय ठरेल.” असे टेलर पुढे बोलताना म्हणाला.

आक्रमक क्रिकेटने स्वत:ची ओळख बनवणाऱ्या टेलरने म्हटले की, ‘प्रत्येक खेळाडूला नेहमी चांगले खेळायचे असते. पण यासाठी स्वत: वर जास्त दबाव टाकू नये. आपल्याला मैदानात खेळाचा आनंद घ्यायचा असतो आणि एका वेळेला फक्त एकाच सामन्याचा विचार करायचा असतो. आशा आहे की, मी याचप्रकारे माझ्या संघामध्ये योगदान देत राहील.’

यापुर्वी न्यूझीलंडचे क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्कलम, डेनियल विटोरी आणि स्टीफन फ्लेमिंग यांनी 100 कसोटी सामने खेळले आहेत. टेलरने 100 कसोटी सामने पूर्ण केल्यास, तोदेखील या यादीत समाविष्ट होईल.

https://twitter.com/Maha_Sports/status/1229782799617593344

https://twitter.com/Maha_Sports/status/1229796589910183937

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---