नील वॅगनर याने मागच्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. न्यूझीलंडच्या या स्टार गोलंदाजाने अचानक घेतलेला हा निर्णय, अनेकांसाठी धक्का देणारा होता. सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका न्यूझीलंड संघ खेळत आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान संघाला पराभव मिळाला असून दुसरा सामना शुक्रवारी सुरू होणार आहे. पण त्याआधी न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रॉस टेलर याने नील वॅगनरनविषयी असे वक्तव्य केले, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
नील वॅगरन (Neil Wagner) न्यूझीलंड क्रिकेटसाठी महत्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये संघासाठी मोलाचे योगदान दिले. पण भविष्याचा विचार करता, त्याला इच्छा नसाताना निवृत्ती घ्यावी लागली, असे रॉस टेलरला वाटते. न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत याविषयी स्पष्ट शब्दात भाष्य केले.
रॉस टेलर (Ross Taylor) इएसपीएनच्या अराउंड द विकेट पॉडकास्टवर बोलताना म्हणाला, “आता हे थोडे समजत आहे. मला असे वाटते की, नील वॅगनरला जबरदस्तीने निवृत्ती घ्यायला लावली आहे. तुम्ही जर त्याची पत्रकार परिषद पाहिली, तर त्याला म्हणायचे होते की, शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर निवृत्ती होईल. त्यामुळेच त्याने स्वतःला खेळण्यासाठी उपलब्ध ठेवले होते.”
टेलर पुढे असेही म्हणाला की, “मला वाटते, भविष्याचा विचार करून त्याला संघात ठेवले गेले नाही. तुम्ही भविष्यासाठी योजना आखली पाहिजे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यासाठी वॅगनरच्या आधी इतर कोणाचा विचार मी करूच शकत नाही. मला विश्वास आहे की, वॅगरन संघात नसल्याने ऑस्ट्रेलियाला दिलासा मिळाला आहे आणि ते निवांत झोपत असतील.”
दरम्यान, वॅगनर हा न्यूझीलंडसाठी केवळ कसोटी फॉरमॅटमध्येच खेळला. कारकिर्दीतील 64 कसोटी सामन्यात त्याने 260 विकेट्स नावावर केल्या. मागच्या आठवड्यात निवृत्तीची घोषणा करताना पत्रकार परिषदेत वॅगनर भावूक झाला होता. निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या डोळ्यांमधील पाणी पाहून जगातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी देखील भावूक झाला होता. रॉस टेलरने जरी स्पष्ट शब्दात वॅगनरच्या निवृत्तीबाबत मत मांडले असले, तरी स्वतः वॅगनरकडून अद्याप अशी कुठलीच प्रतिक्रिया आली नाहीये. (Ross Taylor’s statement on Neil Wagner’s retirement)
महत्वाच्या बातम्या –
‘तो पावरप्ले आणि डेथ ओवर्समध्ये गोलंदाजी करत नाही…’, कमिन्स हैदराबादचा कर्णधार बनताच प्रश्न उपस्थित
IND vs ENG । ‘सर्वात मोठे दुःख हेच की…’, धरमशाला कसोटीआधी अश्विनने व्यक्त केली खंत