वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेचा दुसरा सामना सोमवारी खेळला गेला. भारताने या सामन्यात ५ विकेट्स राखून विजय मिळवला. वेस्ट इंडीजसाठी त्यांचा सलामीवीर फलंदाज ब्रँडन किंग याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले, तर दुसरीकडे त्यांचा महत्वाचा फलंदाज रॉवमन पॉवल पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. पॉवलच्या विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडीजचा सलामीवीर ब्रँडन किंग (Brandon King) याने ५२ चेंडूत ६८ धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने आठ चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्यानंतर डेवॉन थॉमस दुसरा असा फलंदाज ठरला, ज्याने वेस्ट इंडीजसाठी सर्वाधिक धावांचे योगदान दिले. थॉमसने या सामन्यात नाबाद ३१ धावा केल्या. या खेळाडूंच्या चांगल्या प्रदर्शनादरम्यान चर्चा होत आहे ती रॉवमन पॉवेल (Rovman Powell) याच्या विकेटची. भारताचा नवखा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्या जबरदस्त यॉर्कर चेंडूवर पॉवेल त्रिफाळाचीत झाला.
अर्शदीपने ज्या पद्धतीने पॉवेलला बाद केले, ते पाहून प्रत्येकजण हैराण आहे. अर्शदीप भारतासाठी १९ व्या षटकात गोलंदाजी करत होता. याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पॉवेलने एमएस धोनी प्रमाणे हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण अर्शदीपचा यॉर्कर त्याला खेळता आला नाही. परिणामी पॉवेल त्रिफळाचीत झाला. अर्शदीपने या सामन्यात एकूण ४ षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ६.५० च्या इकोनॉमीने २६ धावा खर्च केल्या आणि एक विकेट मिळवली.
https://twitter.com/cbtfspeednews/status/1554222406587527168?s=20&t=XIG0s9PnfwW5-ILpfkqDvQ
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचे खेळाडू अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. संघ १९.४ षटकांमध्ये अवघ्या १३८ धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज हे लक्ष्य सहज गाठेल अशी अपेक्षा होती, मात्र विजय मिळवण्यासाठी त्यांना शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागले. १९.२ षटकता आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर वेस्ट इंडीजने विजय मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी२०मध्ये मॅकॉय तर वनडे अन् टेस्टमध्ये ‘या’ गोलंदाजांनी भारतावर आणलेली गुडघे टेकायची वेळ
वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताने पाहिला पहिला पराभव, ‘या’ ३ खेळाडूंमुळे ओढावली नामुष्की