शनिवारी(24 नोव्हेंबर) पाकिस्तान येथील पख्तूनख्वा या भागात एका क्रिकेटच्या सामन्यावरुन झालेल्या भांडणात सात जणांना आपला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना घडली आहे.
पख्तूनख्वा या भागात शनिवारी लहान मुलांचा क्रिकेट सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान दोन गटांमध्ये भांडणे झाली. या भांडणानंतर या दोन गटांमध्ये गोळीबारही झाला. ज्यामुळे जवळपास सात जणांचा मृत्यू झाला आहे.
याबद्दल पोलिस उपनिरिक्षक एजाज खान यांनी सांगितले की, ‘ही घटना एबोटाबाद जिल्ह्यातील पोलिस चौकीमध्ये झाली आहे. जिथे हे दोन विरोधी गट त्यांच्या मुलांच्या सामन्यादरम्यान झालेल्या भांडणानंतर तक्रार नोंदवण्यासाठी आले होते.’
पुढे खान यांनी सांगितले की ‘त्यानंतर जेव्हा शस्त्र बाळगणाऱ्या दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार चालू केला तेव्हा पोलिस चौकी ही युद्धभूमीप्रमाणे झाली होती. एका गटाला गोळीबार करताना पाहुन दुसऱ्या गटानेही प्रतिउत्तरादाखल गोळीबाराला सुरुवात केली.’
या गोळीबारामुळे 7 जणांचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे. या 7 जणांमधील तिघेजण एका गटाचे होते तर 4 जण दुसऱ्या गटाचे होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–ब्रावोने शब्द पाळला, आपली बॅट दिली त्या खास व्यक्तीला
–जगातील सर्वच दिग्गज क्रिकेटपटूंचे विक्रम मोडले बांगलादेशच्या शाकिबने
–म्हणून धोनी २०११ विश्वचषक फायनलमध्ये युवराज आधी आला फलंदाजीला