नुकताच बांगलादेशचा न्यूझीलंड दौरा संपला आहे. या दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेत यजमान न्यूझीलंडने पाहुण्या बांगलादेशचा व्हाईटवॉश केला आहे. या दौऱ्यातील टी२० मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या न्यूझीलंडच्या फिन ऍलेन याने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर तो शुक्रवारी (०२ एप्रिल) आयपीएल २०२१ साठी रवाना झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसह आयपीएलप्रेमीची त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
आयपीएल २०२१ ची सुरुवात ९ एप्रिल रोजी होणार असून मुबंई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात हंगामातील पहिला सामना होणार आहे. हा सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू चेन्नईत जमायला सुरू झाले आहेत. त्यामुळे ऍलेननेही बांगलादेशविरुद्धची मालिका संपवून भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे.
यावेळी विमानात बसले असतानाचा एक फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘लवकरच भेटूया आरसीबी.’ आरसीबीच्या बऱ्याच चाहत्यांनी त्याच्या स्टोरीतील फोटोचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यावरुन चाहत्यांना त्याला खेळताना पाहण्यासाठी किती उत्सुक आहेत, हे दिसून येते.
Yesterday – 71(29)
Today – On the way to Chennai to join with Royal Challengers Banglore in IPL 2021.Finn Allen is coming. pic.twitter.com/sOQsVauNgn
— Johns. (@CricCrazyJohns) April 2, 2021
Finn Allen is one the way to join RCB ahead of the IPL 2021. pic.twitter.com/vWgt3swtlC
— Tanuj Singh (@ImTanujSingh) April 2, 2021
बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ लिलावात २१ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ऍलेनला २० लाख रुपयांच्या मुळ किंमतीला विकत घेतले होते. या नव्या शिलेदाराने नुकत्याच बांगलादेशविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधले होते. या सामन्यात त्याने २९ चेंडूत ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
Finn Allen's maiden T20I fifty comes in quick time 🔥 https://t.co/Y1uH9CmveS #NZvBAN pic.twitter.com/MLFNlzkpQ7
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 1, 2021
अशात आयपीएल २०२१ मध्ये बेंगलोरकडून खेळताना ऍलेनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का?, संधी मिळाल्यास तो कशी कामगिरी करेल?, हे पाहणे औतुस्क्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! आयपीएलपुर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह
हाव क्यूट! आयपीएलपुर्वी कॅप्टन रोहितचा रोमँटिंक अंदाज, पत्नीसोबत काढला ‘सुपरक्यूट फोटो’
बाबा नको ना जाऊ! आयपीएल वारीला निघताना वॉर्नरची लेक गळ्याला पडून ढसाढसा रडली; पाहा तो क्यूट क्षण