---Advertisement---

विराट-अनुष्कासह चहलनेही केले केक कापून सेलिब्रेशन, नक्की काय होते कारण

On: शनिवार, ऑगस्ट 29, 2020 9:43 PM
---Advertisement---

आयपीएलचा 13 वा हंगाम सुरु होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीेने सर्वांना तो जानेवारी 2021 मध्ये वडील बनणार असल्याची गोड बातमी दिली. या बातमीनंतर तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या गोड बातमीसाठी आरसीबी संघाने खास अंदाजात सेलिब्रेशन करत अभिनंदन केले आहे.

सध्या आरसीबी संघ आयपीएलच्या 13 व्या मोसमासाठी युएईमध्ये असून त्यांच्या संघातील सर्व सदस्यांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे, त्यामुळे सर्वांनी जैव-सुरक्षित वातावरणात प्रवेश केला आहे. यावेळी आरसीबीने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये सर्व खेळाडूं जैव-सुरक्षित वातावरणात आल्यानंतर आनंदी दिसत आहेत.

याबरोबरच या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का केक कापून सेलिब्रेशन करतानाही दिसत आहेत. अनुष्काही विराटसह युएईला गेली आहे.

त्यांच्यासह युजवेंद्र चहलही दिसला. त्याच्यासाठीही आरसीबीने केकची व्यवस्था केली होती. त्याचाही नुकताच धनश्री वर्माबरोबर साखरपूडा झाला आहे. धनश्री डॉक्टर आहे. तसेच ती डांसर आणि युट्यूबरही आहे.

अनेक भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणेच विराटही जवळपास 5 महिन्यांनतर आयपीएलमधून मैदानात पाऊल ठेवणार आहे. हा आयपीएलचा मोसम 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये पार पडणार आहे. या कालावधीत सर्व संघातील सर्व सदस्य जैव-सुरक्षित वातावरणात राहतील. तसेच त्या सर्वांची नियमितपणे कोरोना चाचणी होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनी कितीही ग्रेट असला तरी हॉल ऑफ फेममध्ये सामील व्हायला पहावी लागणार या कारणामुळे वाट

असा परफेक्ट फलंदाज मी तरी पाहिला नाही, गावसकरांनी केले ‘या’ क्रिकेटरचे जोरदार कौतूक

सुरेश रैनाने माझ्यासाठी जे- जे केलं तसं दुसरं कुणी कुणासाठी करु शकत नाही

ट्रेंडिंग लेख –

बापरे! तुमची लाडकी मुंबई इंडियन्स युएईत रहाते अतिशय महागड्या हॉटेलात, एका दिवसाचे भाडे…

एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा

आयपीएलमधील ‘हे’ ३ खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात टी२० विश्वचषक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---