---Advertisement---

पंजाबविरुद्धची मॅच गमावत आरसीबीच्या अपेक्षांना झटका, आता प्लेऑफमध्ये कसा पोहोचणार फाफचा संघ?

On: शनिवार, मे 14, 2022 6:28 PM
RCB-Team
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात शनिवारी (१३ मे) आयपीएल २०२२चा ६०वा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ९ विकेट्सच्या नुकसानावर २०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगलोरच्या संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि २० षटकात बेंगलोरला फक्त १५५ धावाच करता आल्या. परिणामी पंजाबने ५४ धावांच्या मोठ्या अंतराने बेंगलोरला पराभूत केले. या पराभवानंतर बेंगलोरचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर बनला आहे. 

या सामन्यात (RCB vs PBKS) प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून सलामीवीर जॉनी बेयरस्टो याने २९ चेंडूत ६६ धावांची झंझावाती खेळी केली. तसेच लियाम लिविंगस्टोननेही ४२ चेंडूत ७० धावा फटकावल्या. बेयरस्टो आणि लिविंगस्टोनच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पंजाबने धावफलकावर २०९ धावा लावल्या. पंजाबच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून एकही फलंदाज साधे अर्धशतकही करू शकला. या निराशाजनक प्रदर्शनामुळे बेंगलोरच्या प्लेऑफच्या अपेक्षांना झटका बसला आहे.

सध्या बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक १३ सामने खेळल्यानंतर बेंगलोरच्या खात्यात १४ गुण आहेत. पंजाबकडून स्विकारलेल्या दारुण पराभवानंतर त्यांचा नेट रन रेट मात्र खालावला आहे, -०.३२३ इतका झाला आहे. जर बेंगलोरने हा सामना जिंकला असता, तर त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे खुले झाले असते.

आता प्लेऑफमध्ये कसा पोहोचणार बेंगलोर संघ?
पंजाबविरुद्ध पराभूत झाल्यामुळे बेंगलोरसाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांचा साखळी फेरीतील केवळ एक सामना शिल्लक राहिला असून त्यांना कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. बेंगलोरचा हा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध रंगणार आहे. अशात हा सामना मोठ्या फरकाने जिंकत बेंगलोरचा संघ प्लेऑफमधील (RCB Play Off Equation) त्यांचे स्थान निश्चित करू शकतो. परंतु जर त्यांनी हा सामना गमावला, तर त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागू शकते.

अशात बेंगलोर संघाला गुजरातविरुद्धचा शेवटचा साखळी फेरी सामना जिंकत प्लेऑफमध्ये मजल मारता येईल की नाही? हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२२ मध्ये एकाही सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेले ५ खेळाडू, विश्वविजेत्या कर्णधाराचाही समावेश

उमरान मलिकच्या वडिलांना आहे विश्वास, लवकरच भारतीय संघासाठी खेळेल मुलगा; वाचा संपूर्ण वक्तव्य

ऑरेंज कॅप विजेत्या बटलरने नेट्समध्ये केली चहलला गोलंदाजी; दोघांमधील मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---