इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) चे वेळापत्रकर जाहीर करण्यात आले आहे. आगामी आयपीएल हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना चेन्नई सपुर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या चाहत्यांना त्यांच्या संघाचा पहिला सामना २७ मार्चला पाहायला मिळेल. आरसीबी आणि पंजाब किंग्जमध्ये हा सामना खेळला जाईल.
आरसीबी (Royal Challengers Bangalore) संघ साखळी फेरीत त्यांचा पहिला सामना २७ मार्चला पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार असून शेवटचा सामना १९ मे रोजी खेळेल. हा शेवटचा सामना आरसीबीला नवीन फ्रेंचायझी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे. दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने मागच्या हंगामापर्यंत आरसीबीचे नेतृत्व केले होते, पण आगामी हंगामात संघाला नवीन कर्णधाराची आवश्यकता असणार आहे. मागच्या हंगामादरम्यान विराटने स्पष्ट केले होते की, हा त्या कर्णधाराच्या रूपातील शेवटचा हंगाम असेल. पुढच्या हंगामापासून तो खेळाडूच्या रूपात संघासोबत सामील होईल.
आरसीबीचा दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्ससोबत होईल, जो ३० मार्चला मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात आरसीबीसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल. हा सामना ५ एप्रिलला मुंबईच्याच वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जाईल. साखळी फेरीमधील शेवटच्या तीन सामन्यांचा विचार केला, तर संघाला ८ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद, १३ मे रोजी पुन्हा पंजाब किंग्ज आणि १९ मे रोजी गुजरात टायटन्स यांच्याशी आमना सामना करायचा आहे.
दरम्यान, आगामी आयपीएल हंगामाची सुरुवात नेहमीप्रमाणे मागच्या वर्षी अंतिम सामन्यात पोहोचलेल्या संघामधील सामन्याने होईल. केकेआर आणि सीएसकचे मागच्या हंगामात अंतिम सामन्यातपर्यंत पोहोचले होते आणि या हंगामाचा पहिला सामना याच दोन संघात खेळवला जाईल. हा सामना २६ मार्चला मुंबईत वानखडे स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
जाहीर केल्या गेलेल्या वेळापत्रकानुसार आगामी हंगामात दिवसा खेळला जाणारा सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होईल, तर रात्रीचा सामना सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामने मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियमवर खेळळे जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
माही वे! आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होताच धोनीने सुरू केला सराव; फोटो होतोय जोरदार व्हायरल
आयपीएल २०२२मध्ये ‘या’ ३ परदेशी खेळाडूंना मिळू शकते दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिली पसंती