इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा कोरोना असल्या कारणाने भारतातील ६ शहरांमध्ये खेळवण्यात येत आहे. यात मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगलोर आणि अहमदाबादचा समावेश आहे. यंदा कोणत्याही संघाला आपल्या होम ग्राऊंडवर खेळण्याची संधी मिळणार नाहीये. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरुवातीचे सामने खेळवले गेले. यानंतर पुढील सामने आता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. अशातच सर्व खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबईत हजेरी लावली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने चेन्नईच्या मैदानावर विजयची हॅट्रिक केली आहे. आता त्यांचे पुढील सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. अशातच कर्णधार विराट कोहलीसह त्याची पत्नी अनुष्का शर्माला देखील मुंबई विमानतळावर पाहिले गेले आहे. अनुष्का आपली चिमुकली वामिकासोबत दिसून आली आहे.
मुंबईत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला २ सामने खेळायचे आहेत. तसेच मुंबई आणि चेन्नईनंतर पुढील सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम आणि दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.
मुंबईच्या विमानतळावर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या टी शर्टवर दिसून आला. तर अनुष्का शर्मा पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घालून दिसून आली. तसेच तिच्यासोबत वामिका देखील होती. त्यांच्या तोंडावर मास्कसह शिल्ड लावल्याचे दिसून आले होते.
https://www.instagram.com/p/CN2i6OWAwC6/?igshid=2bz5gckenhv2
https://www.instagram.com/p/CN2l-sjAydD/?igshid=jmcsvezhd5hi
यासोबतच एबी डिविलियर्स देखील आपल्या पत्नी आणि मुलांसह विमानतळावर दिसून आला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्व खेळाडू खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करतान दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CN2h2nkgtSi/?igshid=laaqckfz6ug0
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी या हंगामाची सुरुवात चांगली राहिली आहे. त्यांनी खेळलेल्या तीनही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या प्रतिसपर्धी संघांमध्ये मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा पुढील सामना २२ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स संघासोबत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एका विभागातही स्वत:ला सिद्ध करू शकला नाही, मग तो अष्टपैलू कसा? दिग्गजाची ‘या’ भारतीय खेळाडूला फटकार
चेन्नईच्या हातून राजस्थान चारीमुंड्या चित; कर्णधार संजू म्हणाला, “आम्हाला अपेक्षा नव्हती की…”