---Advertisement---

आयपीएलपुर्वी आरसीबीच्या चितेंत भर, पड्डीकलनंतर ‘हा’ अष्टपैलू कोरोनाच्या विळख्यात

On: बुधवार, एप्रिल 7, 2021 10:21 AM
---Advertisement---

भारतात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. परंतु मैदानावर खेळाडूंनी प्रवेश करायच्या आधीच कोरोनाची एन्ट्री झाली आहे. मागील एका आठवड्यात आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंपैकी बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अष्टपैलू क्रिकेटपटू डॅनियल सॅम्स याची भर पडली आहे.

बेंगलोर संघाने दिलेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल रोजी डॅनियल चेन्नई येथे बेंगलोर संघात सहभागी होता. यावेळी त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र बुधवारी (०७ एप्रिल) दुसरी कोरोना चाचणी केली असता सॅम्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याला इतर खेळाडूंपासून वेगळे विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे.

काही दिवसांपुर्वी बेंगलोर संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पड्डीकलही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर डॅनियललाही कोरोनाची लागण झाल्याने बेंगलोर संघाची चिंता वाढली आहे.

डॅनियल सॅम्स या २८ वर्षीय अष्टपैलूने गतवर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्याला पूर्ण हंगामात दिल्लीकडून केवळ ३ सामने खेळायला मिळाले होते. यात त्याने ५४ धावांची कामगिरी केली होती. त्यानंतर आयपीएल २०२१ लिलावात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बेंगलोरने त्याला ट्रेड करत आपल्या ताफ्यात सहभागी केले.

महत्त्वाच्या बातम्या-

बड्या खेळाडूने निवडले आयपीएल इतिहासातील ५ दिग्गज फलंदाज, गेल-धोनीला दिलं नाही स्थान

गतवर्षीच्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सचं यंदा बदलणार का नशीब? ‘असं’ आहे पंतच्या टीमचं पूर्ण वेळापत्रक

एक नारळ दिलाय… मुंबईकरांनी मराठी गाण्यावर धरला ताल; पाहा त्यांच्या झक्कास डान्सचा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---