---Advertisement---

पहिल्या आयपीएल‌ विजेतेपदासाठी आरसीबीने कसली कंबर, दोन‌ वेळचे BBL विजेते प्रशिक्षक संघात सामील

On: बुधवार, फेब्रुवारी 15, 2023 6:46 PM
---Advertisement---

प्रथमच आयोजित केलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग (Womens Premier League) अर्थात महिला आयपीएलसाठीचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) पार पडला. या लिलावात देश विदेशातील अनेक महिला खेळाडूंवर मोठी बोली लागलेली दिसली. त्याचवेळी या स्पर्धेत संघ खरेदी केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Banglore) फ्रॅंचाईजीने एक मजबूत संघ उभारण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक प्रसिद्ध खेळाडू आरसीबीने आपल्या संघात सामील करून घेतले. त्यानंतर आता फ्रॅंचाईजीने आपले मुख्य प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफची देखील घोषणा केली आहे.

 

आरसीबीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून मुख्य प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफच्या नावांची घोषणा केली. पहिल्याच हंगामासाठी मुख्य प्रशिक्षकपद न्यूझीलंडच्या बेन सॉयर यांच्याकडे सोपवण्यात आले. सॉयर यांच्याच मार्गदर्शनात महिला बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर संघाने दोन वेळा विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. तसेच द हंड्रेड लीगमध्ये बर्मिंघम फिनिक्स संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता.

या संघाचे मुख्य सहाय्यक प्रशिक्षक म्हणून एम. रंगराजन, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक वनिता वीआर व फलंदाजी प्रशिक्षक म्हणून आरएस मुरली यांचा समावेश केला गेला आहे. हेड ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स म्हणून माईक हेसन हे पुन्हा एकदा जबाबदारी निभावतील. तर, संघाची मेंटर म्हणून प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा समावेश केला गेला आहे.

WPL 2023 साठी आरसीबी संघ –

स्मृति मंधाना, सोफी डिवाइन, एलिस पेरी, रेणुका सिंह, रिचा घोष, एरिन बर्न्स, दिशा कासट, इंद्राणी रॉय, श्रेयंका पाटील, कनिका आहूजा, आशा शोभना, हीदर नाइट, डेन वॅन नीकेर्क, प्रीति बोस, पूनम खेमनार, कोमल झंझाड, मेगन शूट, सहाना पवार

(Royal Challengers Banglore Announced Coaches For WPL)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनली टीम इंडिया, इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडले 
नागपूर कसोटी गाजवलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा रँकिंगमध्ये बोलबाला, अश्विन-जड्डू टॉपवर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---