Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागपूर कसोटी गाजवलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा रँकिंगमध्ये बोलबाला, अश्विन-जड्डू टॉपवर

February 15, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
R-Ashwin-And-Ravindra-Jadeja

Photo Courtesy: Twitter/ICC


बुधवारी (15 फेब्रुवारी) आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय संघाला मोठा फायदा झाला असून, ऑस्ट्रेलियाला पछाडत रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ आता कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला आहे. त्याबरोबरच खेळाडूंच्या वैयक्तिक क्रमवारीत देखील फेरबदल झाले असून भारतीय खेळाडूंना यामध्ये मोठा फायदा झाल्याचे दिसून येते. 

आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या वैयक्तिक क्रमवारीमध्ये नागपूर कसोटीत भारतीय संघाच्या विजयात योगदान देणाऱ्या खेळाडूंना लाभ झाला. भारताने हा सामना अवघ्या तीन दिवसात एक डाव आणि 132 धावांनी आपल्या नावे केला होता. या सामन्याचा सामनावीर ठरलेल्या रवींद्र जडेजा याने दोन्ही डावात मिळून सात बळी आणि 70 धावा करण्याची अष्टपैलू कामगिरी केलेली. याच कामगिरीचा त्याला फायदा झाला. पाच महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असलेल्या जडेजाने या कामगिरीच्या जोरावर कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले.

Star performers from the Nagpur and Bulawayo Tests make significant gains in the latest @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings 📈

Details 👇https://t.co/QRn72RdBtd

— ICC (@ICC) February 15, 2023

 

त्याच्यासोबतच या सामन्यात तीन बळी आणि 82 धावांची खेळी केलेल्या अक्षर पटेल याने देखील कारकिर्दीत प्रथमच अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या दहामध्ये येण्याचा मान मिळवला. तो या क्रमवारीत सातव्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघासाठी या सामन्यात सर्वाधिक आठ बळी घेतलेल्या रविचंद्रन अश्विन याने देखील गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

फलंदाजी क्रमवारीचा विचार केल्यास भारताचा कर्णधार रोहित शर्मा आठव्या स्थानी आहे. रोहितने या सामन्यात शतक झळकावले होते. अपघातामुळे भारतीय संघ बाहेर असलेला रिषभ पंत अद्यापही सातव्या स्थानी कायम आहे. त्यानंतर अनुभवी विराट कोहली व श्रेयस अय्यर अनुक्रमे सोळाव्या व 17 व्या स्थानी दिसून येतात. मागील अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा देखील अव्वल पाचमधील आपले स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला.

(New Players Ranking Reveal Ashwin On Two Jadeja Earn Top Spot In All Rounders)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कोहली खोटं बोलला, 9 लोक साक्षीला आहेत’, विराट-गांगुली वादावर चेतन शर्मांचा मोठा दावा 
‘आम्ही पाच जण संपूर्ण भारताचे क्रिकेट चालवतो’, स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मांची बडी बात 


Next Post
Photo Courtesy: Twitter

नागपूर पाठोपाठ दिल्ली कसोटीआधीही स्मिथ आला गुडघ्यावर,‌‌ तुम्हीही वाचा पिच रिपोर्ट

Photo Courtesy: Twitter/BCCI Womens

टी20 विश्वचषक: विंडीजविरूद्ध टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी; स्मृतीचे पुनरागमन, पुणेकर देविकालाही संधी

Photo Courtesy: Twitter/RCB

पहिल्या आयपीएल‌ विजेतेपदासाठी आरसीबीने कसली कंबर, दोन‌ वेळचे BBL विजेते प्रशिक्षक संघात सामील

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143