भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. उभय संघातील दुसरा सामना शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होईल. पहिल्या नागपूर कसोटी प्रमाणेच आता दिल्ली कसोटीच्या खेळपट्टीची देखील चर्चा रंगू लागली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा सरावा दरम्यान खेळपट्टीची पाहणी करताना दिसून आला.
दुसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाने मैदानावर आपले सराव सत्र आयोजित केले होते. त्यावेळेस स्मिथ हा सर्वप्रथम खेळपट्टी कशी आहे हे पाहण्यासाठी गेला. त्याने बराच वेळ खेळपट्टीचे निरीक्षण केले. तसेच, त्यानंतर त्याने थेट गुडघ्यावर बसून खेळपट्टीची चाचणी केली. नागपूर कसोटीआधी देखील त्याने व डेव्हिड वॉर्नरने अशाच प्रकारे खेळपट्टी तपासलेली.
दिल्ली कसोटीची खेळपट्टी प्रथमदर्शनी फिरकीपटूंना मदत करणारी दिसत आहे. कारण खेळपट्टीवर कोणत्याही प्रकारचे गवत ठेवले नाही. खेळपट्टी अगदी कोरडी असल्याने चेंडू पहिल्या दिवशीपासून वळण घेऊ शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघासाठी ही चिंतेची बाब नागपूर कसोटीची खेळपट्टी यापेक्षा काहीशी उत्तम होती. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाने पूर्वग्रह भीती मनात ठेवल्याने त्यांचे फलंदाज त्या सामन्यात पूर्णतः अपयशी ठरले.
भारतीय संघ हा सामना जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या एक पाऊल आणखी जवळ जाईल. तर ऑस्ट्रेलियन संघ मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाला या मालिकेत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यास त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न धुळीस देखील मिळू शकते.
(Steve Smith Examine Delhi Pitch Before Match )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनली टीम इंडिया, इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडले
नागपूर कसोटी गाजवलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा रँकिंगमध्ये बोलबाला, अश्विन-जड्डू टॉपवर