आयपीएल 2024 च्या 58व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा 60 धावांनी पराभव केला. आरसीबीचा चालू हंगामातील हा सलग चौथा विजय आहे. या विजयासह संघानं प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत.
तसं पाहिलं तर, आरसीबीची प्लेऑफचा रस्ता अजूनही खूप अवघड आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघ सध्या 12 सामन्यांत 10 अंकासह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. मात्र आरसीबीसीसाठी जमेची बाजू म्हणजे, संघाचा रनरेट प्लस मध्ये (0.217) आहे. आरसीबीला अजून दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामने खेळायचे आहेत. जर आरसीबीनं उरलेले दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 14 गुण होतील. तेव्हा त्यांना सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.
आरसीबी तिसऱ्या स्थानावर राहून अशाप्रकारे प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते
चेन्नईच्या संघाचा गुजरात, राजस्थान आणि आरसीबीविरुद्ध पराभव होणे.
सनरायझर्स हैदराबादचा गुजरात आणि पंजाब विरुद्ध पराभव होणे.
लखनऊच्या संघानं दिल्ली कपिटल्सला पराभूत करणे, मात्र मुंबईविरुद्ध त्यांचा पराभव होणे.
जरी वरीलप्रमाणे सर्वकाही झालं, तर आरसीबीकडे तिसऱ्या स्थानी आणि लखनऊकडे चौथ्या स्थानी राहून क्वालीफाय करण्याची संधी आहे. जर दिल्लीनं लखनऊला हरवलं तरी आरसीबी तिसऱ्या स्थानी राहू शकते, कारण रिषभ पंतच्या संघाचा रनरेट आरसीबीपेक्षा खराब आहे.
आरसीबी चौथ्या स्थानावर राहून अशाप्रकारे प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते
आरसीबीला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. सोबतच हैदराबाद आणि चेन्नई त्यांचे उर्वरित सामने हरेल, अशी प्रार्थना करावी लागेल. जर चेन्नई आणि हैदराबाद हे दोन्ही संघ 16-16 अंकांपर्यंत पोहचले, तर आरसीबीच्या शक्यता संपून जातील, कारण आरसीबी जास्तीत जास्त 14 अंकांपर्यंत पोहचू शकते.
मात्र जर चेन्नई किंवा हैदराबाद पैकी एक संघ 16 अंकांपर्यंत आणि दुसरा संघ 14 अंकांपर्यंत पोहचला तर आरसीबीच्या शक्यता जिवंत राहतील. अशा परिस्थितीत आरसीबीचा रनरेट चेन्नई, हैदराबाद, लखनऊ आणि दिल्ली यांच्यापेक्षा चांगला असणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
BCCI लवकरच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करेल, राहुल द्रविड यांचं भविष्य काय?