---Advertisement---

IPL 2024 साठी RCB ने रिटेन केले धाकड 18! बडे विदेशी खेळाडू बाहेर

On: रविवार, नोव्हेंबर 26, 2023 6:20 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 साठी खेळाडू रिटेन करण्याच्या अखेरच्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 18 खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वातील या संघाने अनेक मोठ्या परदेशी खेळाडूंना मात्र बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे भारताचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली सलग सतराव्या हंगामात एकाच संघाचे प्रतिनिधित्व करेल.

आरसीबीने कायम केलेले खेळाडू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विल जॅक्स, रिस टोप्ली, विराट कोहली, अनुज रावत, महिपाल लोमरोर, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, कर्ण शर्मा, मनोज भांडगे, वैशाक विजयकुमार, आकाश दीप, मोहम्मद सिराज, हिमांशू शर्मा, राजन कुमार व मयंक डागर (ट्रेड)

आरसीबीने रिलीज केलेले खेळाडू: वनिंदू हसरंगा, जोश हेजलवूड, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, वेन पार्नेल, डेव्हिड विली, हर्षल पटेल, केदार जाधव, सोनू यादव, अविनाश सिंग व सिद्धार्थ कौल.

(Royal Challengers Benglore Retained And Release Players For IPL 2024 Hazlewood Hasranga Harshal Released)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---