आयपीएल (Indian Premier League) 2025च्या मेगा लिलावापूर्वी, बीसीसीआये (BCCI) रिटेंशन आणि नवीन नियम जाहीर केले आहेत. आयपीएल मेगा लिलावापूर्वी संघ 5 खेळाडूंना कायम ठेवू शकणार आहेत. याशिवाय लिलावात राईट टू मॅच कार्डचा (RTM) पर्याय असेल. दरम्यान, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने (Rudra Pratap Singh) धक्कादायक दावा केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) फक्त विराट कोहलीलाच (Virat Kohli) कायम ठेवेल आणि इतर सर्व खेळाडूंना सोडून देईल. असा विश्वास आरपी सिंगला आहे.
आरपी सिंग (Rudra Pratap Singh) म्हणाला की, “रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) कोणतीही अडचण नाही. बंगळुरू फक्त विराट कोहलीलाच (Virat Kohli) कायम ठेवेल आणि इतर सर्व खेळाडूंना सोडून देईल, पण राईट टू मॅच कार्ड वापरून लिलावादरम्यान त्यांच्या आवडीचा कोणताही खेळाडू खरेदी करू शकेल. बंगळुरू रजत पाटीदारसाठी (Rajat Patidar) 11 कोटी रुपये खर्च करणार का? पाटीदार सारख्या खेळाडूला कमी किमतीत पुन्हा सहभागी करून घेण्यासाठी राईट टू मॅच वापरण्याची शक्यता आहे.”
पुढे बोलताना आरपी सिंह म्हणाला, “जर बंगळुरूच्या अनकॅप्ड खेळाडूंबद्दल बोलाल तर अनुज रावत आणि डावखुरा वेगवान गोलंदाज राजन कुमारची नावे तुमच्या मनात येतील. राजन कुमारला खेळण्याची संधी मिळाली नाही, पण तो एक चांगला गोलंदाज आहे. बंगळुरूने नव्या मानसिकतेने जायला हवे.”
आरपी सिंहच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 82 आयपीएल सामन्यात 25.98च्या सरासरीने 90 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 7.90 राहिला आहे, तर स्ट्राईक रेट 19.72 राहिला आहे. आरपी सिंहच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर 67 सामन्यात फलंदाजी करताना 3.47च्या सरासरीने 52 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 68.42 राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
SL vs NZ; कसोटीत तुटला ब्रायन लाराचा रेकाॅर्ड, गोलंदाजाने खणखणीत षटकार ठोकत टाकले मागे
IPL 2025; लखनऊ सुपर जायंट्स केएल राहुलसोबत ‘या’ खेळाडूंना ठेवणार कायम?
न्यूझीलंडविरूद्धच्या विजयानंतर WTCच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा मोठा फायदा! फायनलसाठी ठरणार पात्र?