इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League- IPL) 2023चा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचिमध्ये पार पडला. या लिलावातील पहिला खेळाडू गतविजेत्या गुजरात टायटन्सने खरेदी केला. त्यांनी केन विलियम्सन याला 2 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले. या लिलावत गुजरात बराच सक्रिय दिसला. त्यांनी विलियम्सनबरोबर सहा खेळाडूंना खरेदी केली. त्यातील सर्वात महाग खेळाडू शिवम मावी ठरला. त्याला गुजरातने 6 कोटी रुपयांना खरेदी केले.
हा लिलाव सुरू होता तेव्हा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) भारताच्या माजी खेळाडूंबरोबर बोलताना दिसले. त्यातील एका खेळाडूने मी निवृत्त झालो असून सपोर्ट स्टाफमध्ये कामी येऊ शकतो, असे म्हटले त्यावर नेहराचे उत्तर ऐकण्यासारखे होते. यावेळी माजी क्रिकेटपटू आरपी सिंग आणि नेहरा यांच्यात झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. आरपी सिंग आणि नेहरा या दोघांनी मिळून भारतीय संघासाठी अनेक सामने खेळले आहेत.
झाले असे की जिओ सिनेमाने प्रक्षेपित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये आरपी सिगं, सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांनी सहभाग घेतला होता. आयपीएल लिलावासंबधी असलेल्या या कार्यक्रमात हे तिघेही नेहरासोबत चर्चा करताना दिसले. तेव्हा आरपी सिंग म्हणाला, “तुम्ही उत्तर प्रदेशच्या वेगवान गोलंदाजांना संधी देता. शिवम मावी, मोहम्मद शमी, यश दयाल ….मी पण इथे बसलो आहे, निवृत्त असून सपोर्ट स्टाफमध्ये कामी येईल. तसेच मी पण यूपीचाच आहे, मलाही संधी दे.”
यानंतर नेहरा म्हणतो, “तुम्ही आमच्या काय कोणाच्याही संघात येऊ शकता.” या संभाषणावर चौघेही हसताना दिसले.
या लिलावात मावी हा गुजरातचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातही चढाओढ दिसली. त्याचबरोबर संघाने मोहित शर्माला 50 लाख, जोशुआ लिटलला 4.4 कोटी, उर्विल पटेलला 20 लाख, केएस भरतला 1.2 कोटी आणि ओडियन स्मिथला 50 लाख रुपयांना विकत घेतले. RP Singh request to Gujarat Titans Head Coach Ashish Nehra IPL 2023 auction
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नर्व्हस नाईंटिजचा शिकार झालेला रिषभ पंत म्हणतोय, ‘मी लॅंडमार्कचा विचार करत नाही’
राहुलला आता ‘आऊट ऑफ फॉर्म’ म्हणता येईल! 8 वर्षाच्या कसोटी कारकिर्दीत ठोकली ‘इतकी’ शतके






