---Advertisement---

“ईशानची ती जागा नक्की करा”, वर्ल्डकपआधी दिग्गजाने दिला टीम इंडियाला सल्ला

On: शनिवार, ऑगस्ट 12, 2023 9:46 AM
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीजविरूद्ध टी20 मालिका खेळत आहे. मालिकेत 2-0 अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. अशा स्थितीत भारतीय संघात ईशान किशन याला पुन्हा संधी देण्यात यावी तसेच आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने वनडे संघात त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवावे, असा सल्ला भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग याने दिलेला आहे.

एका प्रसारण वाहिनीवर झालेल्या चर्चेदरम्यान बोलताना त्याने किशन याच्या फलंदाजी क्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. चौथ्या टी20 सामन्यात यशस्वी जयस्वाल याला कायम ठेवावे की, पुन्हा ईशान किशन याला खेळवावे याबद्दल बोलताना तो म्हणाला,

“केवळ एका संधीची ही गोष्ट नाही. ही टी20 मालिका असली तरी, आपण ईशान याला पाचव्या क्रमांकावर खेळवायला हवे. विश्वचषकात राहुल खेळणार नसेल तर ईशान आपला यष्टीरक्षक असेल. ईशान राहुलचा बॅकअप असल्याने त्याला खालच्याच क्रमांकावर संधी देण्यात यावी.”

तो पुढे बोलताना म्हणाला,

“रोहित व गिल हे जोपर्यंत सलामी करत आहे तोपर्यंत ईशान याला संधी मिळणार नाही. सध्या गिलचा फॉर्म चांगला नसला तरी तोच विश्वचषकात देखील दिसेल. अशावेळी किशन सलामीवीराच्या भूमिकेत नसेल.”

वेस्ट इंडीजविरूद्धच्या टी20 मालिकेत पाचव्या क्रमांकावर सध्या संजू सॅमसन हा फलंदाजी करताना दिसत आहे. पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाल्यानंतर त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. तर तिसऱ्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तोदेखील विश्वचषक मोहिमेचा भाग असून, उर्वरित सामन्यांमध्ये तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

(RP Singh Said Ishan Kishan Must Play At 5 Due To World Cup)

महत्वाच्या बातम्या –
आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला मोकळीक! विना प्रशिक्षक खेळणार टी20 मालिका
WIvsIND । विराटचा ऐतिहासिक विक्रम मोडणारा ‘हा’ फलंदाज, टी-20 मालिकेनंतर यादीत होणार मोठा फेरबदल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---