---Advertisement---

आधी क्रिकेटपटू, मग खासदार अन् आता गंभीरच्या खांद्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी, एका क्लिकवर घ्या जाणून

On: शुक्रवार, ऑक्टोबर 7, 2022 6:26 PM
Gautam-Gambhir
---Advertisement---

आरपीएसजी ग्रुपने शुक्रवार, 7 ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा मोजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर याच्यावर एक नवीन जबाबदारी टाकली आहे. आरपीएसजी ग्रुपच्या मालकीची आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्स यांचा गंभीर मेंटॉर आहे. गंभारवरील जबाबदारी वाढवली गेली असून तो आता सुपर जायंट्सचा जागतिक मेंटॉर बनला आहे. आयपीएलप्रमाणेच आरपीएसजी ग्रुपने दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्येही संघ खरेदी केला आहे. गंभीर आता या दोन्ही संघांना मार्गदर्शन करताना दिसेल. 

आयपीएलच्या मागच्या हंगामात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Gaints) या दोन नवीन फ्रँचायझी सहभागी झाल्या होत्या. लखनऊची मालकी संजय गोयंका यांच्या आरपीएसजी ग्रुपने मिळवली होती. आयपीएल हंगाम संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील टी-20 लीगची घोषणा झाली आणि आरपीएसजी ग्रुपने याठिकाणी देखील फ्रँचायझी खरेदी केली. डरबन्स सुपर जायंट्स (Durban’s Super Giants) हे त्यांच्या संघाचे नाव आहे. आता गौतम गंभीर (Gautam Gambhir) सुपर जायंट्सचा जागतिक मेंटॉर बनल्यामुळे त्याला या दोन्ही संघांना मार्गदर्शन करावे लागेल.

लखनऊ सुपर जायंट्सने याविषयीची अधिकृत घोषणा केली आहे. गंभीरच्या हवाल्याने लखनऊ फ्रँचायझीने पोस्ट शेअर केली आहे की, “माझी भूमिका (मेंटॉर) त्याठिकाणी जास्त महत्वाची नाहीये. सर्वात चांगली गोष्ट हीच आहे की, संघाला विजय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत ते (खेळाडू) स्वतः त्याठिकाणी उपस्थित आहेत. सुपर जायंट्सच्या जागतिक मेंटॉरच्या रूपात मी काही अधिकची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्नात असेल. जिंकण्यासाठी आणि खेळासाठी माझ्यात जी उत्सुकता आहे, त्याला नुकतेच आंतरराष्ट्रीय पंख मिळाले आहेत.”

“सुपर जायंट्स कुटुंबाला जागतिक पातळीवर झाप सोडताना पाहणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी मी सुपर जायंट्स कुटुंबाचे आभार मानतो. अणखी खाही रात्री न झोबता काढण्याची वेळ आली आहे, असे समजले तरी चालेल,” असेही या पोस्टमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, गंभीर भारतीय संघाला टी-20 (2007) आणि एकदिवसीय (2011) विश्वचषक जिंकवून देणाऱ्या दोन्ही संघांमध्ये सहभागी होता. त्याने क्रिकेट कारकिर्दीत अनेक असे विक्रम केले आहेत, जे आजही अबाधित आहेत. 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामन्यांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गंभीरने आतापर्यंत भारतीय संघाचा एक क्रिकेटपटू, त्यानंतर खासदार आणि त्यानंतर आयपीएल फ्रँचायझीचा मेंटॉर म्हणून स्वतःची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. आता तो सुपर जायंट्सचा जागतितल पातळीवरील मेंटॉर म्हणून देखील अशाच प्रकारे स्वतःची भूमिका पार पाडले, अशी अपेक्षा आरपीएसजी ग्रुपला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ठरलं तर! गांगुलीचा पत्ता होणार कट, कोण बनणार बीसीसीआयचा ‘दादा?’
‘कतार वर्ल्डकप शेवटचा’, मेस्सीचे निवृत्तीबाबत मोठे भाष्य  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---