आयपीएल, या टी२० लीगमध्ये फलंदाज कमीत कमी चेंडूत झटपट धावा करण्यासाठी प्रयत्नशील असतात. अधिकतर फलंदाज १-२ धावा काढण्यापेक्षा चौकार आणि षटकार मारत धावा जमवण्याला प्राधान्य देतात. मंगळवारी (०५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२मधील तेराव्या सामन्यातही राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर याने नुसते षटकार ठोकत नाबाद ७० धावा जोडल्या. यासह त्याने नवा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
आयपीएल सामन्यात एकाही चौकाराशिवाय सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात बटलरने संयुक्तपणे दुसरे स्थान गाठले आहे. बटलरने या सामन्यात सलामीला फलंदाजीला येत नाबाद ७० धावा फटकावल्या. ४७ चेंडू खेळताना ६ षटकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. आकाश दीपला ३, वानिंदू हसरंगा आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी २ षटकार मारत बटलरने ६ षटकार ठोकले. यादरम्यान त्याने एकही चौकार मारला नाही, हे विशेष.
यासह त्याने एका आयपीएल सामन्यात एकाही चौकाराशिवाय सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात त्याने आंद्रे रसेल आणि डेविड मिलर यांची बरोबरी केली आहे. मिलरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २०१४ मध्ये एका सामन्यात एकही चौकार न मारता ६ षटकार मारले होते. तर रसेलने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हा कारनामा केला होता.
आयपीएल सामन्यात एकाही चौकाराशिवाय सर्वाधिक षटकार:
७- नितीश राणा विरुद्ध पंजाब, २०१७
७- संजू सॅमसन विरुद्ध गुजरात, २०१७
७- राहुल तेवतिया विरुद्ध पंजाब, २०२०
६- डेविड मिलर विरुद्ध राजस्थान, २०१४
६- आंद्रे रसेल विरुद्ध दिल्ली, २०१८
६- जोस बटलर विरुद्ध बेंगलोर, २०२२*
षटकारांचे शतकही या सामन्यातच केले पूर्ण
तत्पूर्वी याच सामन्यात २ षटकारांसह त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील १०० षटकारांचा आकडा (100 Sixes In IPL) गाठला आहे. यासह तो आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारा अकरावा विदेशी खेळाडू बनला आहे. त्याच्यापूर्वी ख्रिस गेल सर्वाधिक ३५७ षटकारांसह या विक्रमाच्या यादीत अव्वलस्थानी (Most Sixes In IPL By Overseas Players) आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हसरंगापुढे सॅमसन नेहमीच टेकतो गुडघे, यंदाही दुर्देवीरित्या झेलबाद होत नकोशा विक्रमात बनला अव्वल
जोस इज द बॉस! पुन्हा बनला ‘शतकवीर’, पण यावेळी धावांची नव्हे तर षटकारांची सेंच्यूरी; वाचा सविस्तर
मुंबई- पुणे प्रवासात सचिन तेंडुलकरचा ‘आम्ही डोलकर’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ