भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आयपीएलच्या चालू हंगामात खराब फॉर्ममध्ये दिसला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विराटने मोठी खेळी, पण त्यानंतर पुन्हा त्याचा सूर हरवला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध शुक्रवारी (दि. २७ मे) महत्वाच्या सामन्यात विराट अवघ्या ७ धावा करून बाद झाला. या निराशाजनक प्रदर्शनानंतर विराटच्या नावार नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय संघ आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चालू आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. या हंगामातील ही ७ वी वेळ आहे, जेव्हा विराट एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. विराटने एका आकडी धावसंख्येवर गमावलेल्या विकेट्सचा विचार केला, तर त्याने सात सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये शून्यावर विकेट गमावली आहे. या सात सामन्यांमध्ये त्याने ५, १, ०, ०, ९, ० आणि आता ७ अशी निराशाजनक कामगिरी केली आहे.
A huge early success with the ball for @rajasthanroyals! 👏 👏@prasidh43 strikes as captain @IamSanjuSamson takes the catch. 👍 👍#RCB lose Virat Kohli.
Follow the match ▶️ https://t.co/orwLrIaXo3 #TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/ocA84wqLnG
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2022
दरम्यान, उभय संघातील या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याने विराटला तंबूत धाडले. आरसीबीच्या डावातील दुसऱ्या षटकात प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीसाठी आला होता. त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर विराट यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या हातात झेलबाद झाला. विराटची महत्वाची विकेट गमावल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर युवा रजत पाटीदार (Rajat Patidar) फलंदाजीसाठी आला. मागच्या सामन्यात शतक केलेला पाटीदार या सामन्यात देखील चांगल्या फॉर्ममध्ये खेळला. त्याने अवघ्या ४० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
विराटपाठोपाठ कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plasis) देखील २५ धावा करून विकेट गमावली. राजस्थानचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या जाळ्यात डू प्लेसिसने विकेट गमावली. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल या सामन्यात २४ धावांवर विकेट गमावली. ओबेड मॅकॉयने मॅक्सवेलची विकेट घेतली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जर रेकॉर्ड बूकमध्ये नाव पाहिजे असेल, तर ‘हे’ काम कर; सेहवागचा पंतला मोलाचा सल्ला
अरे व्वा! निखिलच्या सुरेख प्रदर्शनाने जाएंटस अ संघाचा विजय