---Advertisement---

IPL 2020: राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी

On: शनिवार, ऑक्टोबर 10, 2020 11:06 AM
---Advertisement---

शारजाहच्या मैदानावर शुक्रवारी (9 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 46 धावांनी पराभूत केले. नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने 20 षटकांत 184 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ 138 धावा करता आल्या. सामन्यादरम्यान घडलेल्या काही खास आकडेवारीवर आपण नजर टाकू.

• प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने या हंगामात सर्व सामने जिंकले आहेत. लक्ष्यचा पाठलाग करताना संघाला एका पराभवाला सामोरे जावे लागले.

• राजस्थानचा मध्यमगती गोलंदाज अँड्र्यू टाय जवळपास एक वर्षानंतर क्रिकेट सामन्यात खेळला.मागच्या वेळी 23 ऑक्टोबर 2019 रोजी तो मार्श कपमध्ये खेळताना दिसला होता.

• या सामन्यादरम्यान राजस्थान संघाने पॉवरप्लेमध्ये 2 गडी बाद केले. या हंगामात पॉवरप्लेमधील त्यांची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

• या सामन्यादरम्यान राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिला षटकार ठोकला. त्यानंतर त्याने कारकिर्दीतील पहिला चौकारही लगावला.

• यशस्वी जयस्वालने आयपीएलमधील खेळलेल्या त्याच्या तिसर्‍या सामन्यात फलंदाजी करताना पहिल्यांदाच दुहेरी आकडा पार केला.

• या हंगामात शारजाहच्या मैदानात खेळला गेलेला हा पहिला सामना आहे ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 धावा करता आल्या नाही.

• दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचा हा सलग 20 वा सामना आहे ज्यामध्ये त्याने कमीतकमी एक बळी घेतला आहे.

• कागिसो रबाडाने या हंगामात 15 बळी घेतले आहे. पर्पल कॅप त्याच्याच नावावर आहे

• दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत 21 सामने झाले आहेत. ज्यामध्ये राजस्थानने 11 सामने जिंकले होते आणि दिल्लीने 9 सामने जिंकले होते, हा सामना जिंकून दिल्लीने दहावा विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---