---Advertisement---

RSWSमध्ये रविवारी क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी! एकाच दिवशी ‘जयसूर्या-लारा’सह अनेक दिग्गज खेळणार सामना

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 2:38 PM
sanath-jayasuriya
---Advertisement---

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये रविवारी (11 सप्टेंबर) दोन सामने होणार आहेत. पहिला सामना बांगलादेश लिजेंड्स आणि वेस्ट इंडिज लिजेंड्स यांच्यात होणार आहे. दुसरा सामना श्रीलंका लिजेंड्स आणि ऑस्ट्रेलिया लिजेंड्स यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहेत.

रविवारी दोन डावखुऱ्या दिग्गजांची फलंदाजी पाहण्याचा थरार क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. सनथ जयसूर्या श्रीलंकेसाठी सलामी देईल. त्याचबरोबर वेस्ट इंडिजसाठी कर्णधार ब्रायन लारा सलामीवीराची भूमिका बजावणार आहे. या हंगामातील रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये 8 संघ सहभागी होत आहेत. यादरम्यान डेहराडून, कानपूर, इंदूर आणि रायपूर येथे 23 सामने खेळवले जाणार आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-२० विश्वचषकात बुमराह आणि हर्षल पटेल खेळणार! दोघांनी मिळवलीये फूल फिटनेस
US Open 2022: इगा स्विएटेकने ओन्स जॅबेयूरचा पराभव करत जिंकले कारकिर्दीतील तिसरे ग्रँड स्लॅम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---