प्रतिष्ठित अशा इंडियन प्रीमियर लीग २०२०चे बिगुल वाजले आहे. आतापर्यंत या हंगामातील एकूण १० सामने पार पडले आहेत. दरम्यान एका नव्हे तर दोन सामने बरोबरीत सुटले आणि त्यांचा अंतिम निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली आहे.
आयपीएलचा दूसरा सामना म्हणजे किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघातील सामन्यात पहिल्यांदा सुपर ओव्हर खेळली गेली. त्यानंतर सोमवारी (२८ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झालेल्या सामन्याचा निकालही सुपर ओव्हरद्वारे लावण्यात आला.
तसं तर आपणा सर्वांना हा साधा-सोपा नियम माहिती आहे की, सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाते आणि त्यावरुन विजेता संघ घोषित केला जातो. पण जर सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी सारख्याच धावा केल्या तर काय?
क्रिकेटच्या नियमांनुसार, जर सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली, तर सामन्याचा अंतिम निकाल लावण्यासाठी अजून एक सुपर ओव्हर खेळवण्यात येते. अशात जर दूसऱ्या सुपर ओव्हरमध्येही एक संघ दूसऱ्या संघाने केलेल्या धावांइतक्याच धावा करु शकला (बरोबर धावा) तर अजून एकदा सुपर ओव्हर खेळली जाते. अशाप्रकारे शेवटी सामन्याचा निर्णय लागेपर्यंत अमर्यादितवेळा सुपर ओव्हर खेळवल्या जाऊ शकतात.
महत्त्वाचे म्हणजे, सुपर ओव्हरमध्ये फलंदाजांनी केलेल्या धावा किंवा गोलंदाजांनी घेतलेल्या विकेट्सची नोंद त्या खेळाडूंच्या खात्यात जमा होत नाही. कारण सुपर ओव्हर ही फक्त सामन्याचा निर्णय लावण्यासाठी खेळवली जाते. आयपीएलच्या सुपर ओव्हरमध्ये फक्त ३ फलंदाज आणि १ गोलंदाज खेळू शकतो. म्हणजे, जर एखाद्या संघातील २ फलंदाज सुपर ओव्हरमध्ये बाद झाले, तर समोरचा संघाचा डाव संपलेला असतो. याशिवाय सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांना एक-एक रिव्ह्यू घेण्याची मुभा असते.
महत्त्वाच्या बातम्या-
…आणि ‘त्याने’ ३५ व्या अर्धशतकासाठी केवळ २ धावा कमी असताना जडला षटकार, पाहा व्हिडिओ
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिल्लीचे संकट वाढले, ‘हा’ क्रिकेटपटू तीन सामन्यातून बाहेर?
विक्रम तर अनेक झाले, पण मुंबईकडून तीनवेळा ‘हा’ विक्रम करणारा पोलार्ड एकटाच
ट्रेंडिंग लेख-
परिस्थितीने घडवलेला जगातील सर्वोत्तम ऑफस्पिनर, ज्याचा इकॉनॉमी रेट होता २ पेक्षाही कमी
बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात झाली ‘या’ विक्रमांची नोंद
जाणून घ्या आयपीएलमधील सर्व संघाच्या प्रशिक्षकांचा पगार, मुंबईच्या प्रशिक्षकाला मिळतोय…






