इंग्लंडचा फलंदाज जो रूट (Jo Root) भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत जबरदस्त फलंदाजी करत आहे. रूटने भारताचा दिग्गज खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज जॅक्स कॅलिस (Jacks Kallis) यांचा विक्रम मोडीत काढला आहे. जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. आता रूट कसोटीतील धावांच्या यादीत केवळ भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्याच मागे आहे.
रूटने जेव्हा 31 धावा पूर्ण केल्या, त्याक्षणी तो जगातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रिकी पॉन्टिंग (Riki ponting) आहे, तर सर्वाधिक धावांचा जागतिक विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा.
सचिन तेंडुलकर – 15,921 धावा
रिकी पाँटींग – 13,378 धावा
जो रूट – 13,290 धावा
जॅक्स कॅलिस – 13,289 धावा
राहुल द्रविड – 13,288 धावा
सध्या जो रूट सचिनपेक्षा तब्बल 2,500 हून अधिक धावांनी मागे आहे. भारताविरुद्ध चालू चौथ्या कसोटीत रूट अजूनही फलंदाजी करत आहे. त्याने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले असून 70 ओव्हर्सनंतर तो अजूनही मैदानावर खेळत आहे.






