नवी दिल्ली । मागील काही काळापासून जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा ही दोन नावे खूप मोठी झाली आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट आणि उपकर्णधार रोहितच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जेव्हाही हे दोघे एकत्र मैदानावर येतात, तेव्हा चाहत्यांची उत्सुकता खूप वाढते. असे असले तरीही या जोडीमध्ये आणखी एक ट्रेंड मागील काही काळापासून तयार झाला आहे.
तो असा की, जेव्हाही रोहित (Rohit Sharma) द्विशतकी खेळी करतो, तेव्हा विराट (Virat Kohli) धावबाद होतो. रोहितच्या नावावर वनडेमध्ये ३ द्विशतक आहेत. ज्यामधील २ द्विशतकांदरम्यान आपसातील ताळमेळच्या अभावामुळे नॉन-स्ट्रायकर एन्डवर असणारा विराट धावबाद (Run Out) झाला.
आर अश्विनने घेतली मजा-
सध्या कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. यांमधून क्रिकेटपटू रोमांचक किस्स्यांचा खुलासा करत आहेत. अशाच प्रकारे भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विन आणि रोहित यांनी इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत चर्चा केली. यादरम्यान अश्विनने रोहितला प्रश्न विचारला की, “तू आपल्या युनिक ट्रेंडबद्दल सांग. ज्यामध्ये तो द्विशतक करतो, तर विराट दुसऱ्या बाजूला बाद होतो.”
यावर प्रत्युत्तर देत रोहित म्हणाला की, “असे २वेळा झाले आहे. ज्या सामन्यात मी २६४ धावा केल्या होत्या, त्या सामन्यात विराट धावबाद झाला होता. कोलकाता येथील श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात तो स्ट्राईक वर होता आणि त्याने गोलंदाजाच्या डाव्या हाताकडून चेंडू मारला. तेव्हा स्वाभाविक आहे की, जेव्हा तुम्ही नॉन-स्ट्रायकर एन्डवर असता, तेव्हा तुम्ही परत जाता आणि स्वत:ची विकेट वाचवता.”
“त्यामुळे त्यावेळी मीदेखील परत गेलो होतो आणि मी विराट कुठे आहे हे पाहण्यासाठी वळलो, तेव्हा तो तिथेच होता. त्यावेळी अशी कोणतीच पद्धत नव्हती, ज्याने मी दुसऱ्या बाजूला जाऊ शकत होतो,” असेही रोहित यावेळी म्हणाला.
त्यानंतर रोहित म्हणाला की, “अशाप्रकारच्या मोठ्या खेळीदरम्यान जेव्हा विराटसारखा फॉर्ममधील खेळाडू बाद होतो, तेव्हा अतिरिक्त दबाव येतो.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-दिनेश कार्तिक होणार होता मुंबई इंडियन्सचा कर्णधार, या खेळाडूने पुढाकार घेतं केले रोहितला…
-अर्जून तेंडूलकरचे केस कापले थेट मास्टर ब्लास्टरने, खास व्हिडीओ पहा
-रोहित म्हणतो, कॅप्टन कूल धोनी नसता तर ही गोष्ट कधीच नसतो करु शकलो