भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मागच्या 8 महिन्यांपासून संघातून बाहेर आहे. डिसेंबर 2022 मध्ये पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. अपघातात झालेल्या दुखापतीतून तो अद्याप सावरला नाहीये. पण येत्या काही महिन्यांमध्ये पंत पुन्हा एकदा भारतासाठी मैदान गाजवताना दिसू शकतो. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगलोर येथून मिळत असलेल्या माहितीनुसार, तो 140 किमी प्रति तास वेगाच्या चेंडूंचा यशस्वीपणे सामना करतोय.
रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारचा अपघात झाला, तेव्हा तो अक्षरशः चालूही शकत नव्हता. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. सोबतच संपूर्ण शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी दुखापत झाली होती. अपघातात पंतची महागडी गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने त्याने गाडी पेटण्याआधीच बाहेर उडी मारली होती. भारतीय क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का होता. डिसेंबर 2022च्या शेवटच्या आढवड्यात त्याला ही दुखापत झाली होती. पण अद्याप तो मैदानात पुनरागमन करू शकला नाही.
एनसीएमधून मिळत असलेल्या माहितीनुसार, पंत अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. मागील दोन दिवसांपासून त्याने वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यास सुरुवात केली असून, 140 किमी प्रति तास वेगवान गोलंदाजांचा तो यशस्वीपणे सामना करतोय. यष्टीरक्षणाचा सराव त्याने यापूर्वीच सुरू केला आहे. पुढील आव्हान आता वेगवान हालचाली करण्याचे असेल.
पंत सध्या बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करत आहेत. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक खेळला जाणार आहे. पण भारतात होणाऱ्या या वनडे विश्वचषकात पंत खेळताना दिसण्याची शक्यता कमीच आहे. कारण तोपर्यंत पंत आपली पूर्ण फिटनेस मिळवेल, याची शक्यता फारच कमी आहे.
(Rushabh Pant Started Batting Practice Against 140 Plus Bowlers At NCA)
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात है! विस्फोटक खेळीनंतर तिलकला दक्षिण आफ्रिकेहून कुणी पाठवला व्हिडिओ मेसेज? वाचा बातमी
विंडीजने मोडला भारताचा गर्व! 200व्या सामन्यात रोखला विजयरथ; काय होता 1, 50, 100 अन् 150व्या सामन्याचा निकाल?