क्रिकेट सामन्यात अनेकदा अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष त्याकडे वेधले जाते. असेच काहीसे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहायला मिळाले. या सामन्यात एक मजेशीर घटना घडली, जेव्हा भारतीय संघ आव्हानाचा पाठलाग करत असताना भारतीय संघाचा फलंदाज युझवेंद्र चहल फलंदाजीला उतरला. खरं तर, तो आधी फलंदाजीसाठी मैदानावर आला आणि पुन्हा मैदानाबाहेर गेला.
त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 150 धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला अपयश आले, त्यामुळे संघाला 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय डावादरम्यान युझवेंद्र चहल 10व्या स्थानी फलंदाजी (Yuzvendra Chahal Batting on 10th Number) करण्यासाठी उतरला होता. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) मैदानावर उतरला होता. मात्र, संघ व्यवस्थापनाला चहलच्या जागी मुकेश कुमार (Mukesh Kumar) याला 10व्या क्रमांकावर पाठवायचे होते.
त्यामुळे चहलला मैदानावरून पुन्हा एकदा पव्हेलियनच्या दिशेने जावे लागले. मात्र, चहल पुन्हा एकदा मैदानावर आला होता. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा मैदानावर यावे लागले आणि त्याने भारतीय संघासाठी 10व्या क्रमांकावर फलंदाजी केली. फलंदाजीसाठी चहलचा धावपळीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या चहल आणि मुकेश दोघांना बॅटमधून काही खास करता आले नाही. दोघेही प्रत्येकी 1 धाव करून नाबाद राहिले.
Yuzvendra Chahal walked out at No.10, but the Indian team wanted Mukesh Kumar. Chahal walked off and entered again as he took the field already#Yuzvendrachahal😂😂#INDvWI pic.twitter.com/8rWxh30ahh
— Md Nayab 786 🇮🇳 (@mdNayabsk45) August 3, 2023
भारत पिछाडीवर
भारतीय संघ 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 0-1ने पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत वेस्ट इंडिज संघाला 149 धावांवर रोखले होते. यावेळी भारताकडून युझवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने यावेळी 2 विकेट्स नावावर केल्या होत्या. मात्र, भारतीय फलंदाजांनी निराश केले. त्यामुळे भारतीय संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावत 145 धावाच करता आल्या. आता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील दुसरा टी20 सामना 6 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. (cricketer yuzvendra chahal want to bat at number 10 but team management want to send mukesh kumar video viral)
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात है! विस्फोटक खेळीनंतर तिलकला दक्षिण आफ्रिकेहून कुणी पाठवला व्हिडिओ मेसेज? वाचा बातमी
विंडीजने मोडला भारताचा गर्व! 200व्या सामन्यात रोखला विजयरथ; काय होता 1, 50, 100 अन् 150व्या सामन्याचा निकाल?