वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेल टी२० क्रिकेटचा सर्वकालीन महान फलंदाज मानला जात आहे. चाळीस वर्षाचा गेल अजूनही क्रिकेटमध्ये सक्रिय असून, आजही गोलंदाजांमध्ये त्याच्या नावाची दहशत आहे. जगभरातील सर्व गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या गेलला त्याच्या ‘ड्रीम टी२०’ संघात कोणाला स्थान द्यायला आवडेल, असे विचारले असता त्याने तीन खेळाडूंची नावे घेतली. विशेष म्हणजे यामध्ये एका भारतीयाचा देखील समावेश आहे.
या खेळाडूंची केली निवड
अबुधाबी येथे झालेली टी१० क्रिकेट लीग गाजवल्यानंतर गेल २० फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसेल. तो या स्पर्धेत क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच वेळी गेलला त्याच्या ‘ड्रीम टी२०’संघात कोणाला सामील करण्यास आवडेल? असे विचारले असता त्याने तीन नावांचा उल्लेख केला.
गेलने म्हटले, “माझ्या संघात आंद्रे रसेल, निकोलस पूरन व रोहित शर्मा यांचा समावेश असेल. हे तीनही खेळाडू अगदी काही क्षणात सामन्याचे चित्र पाठवू शकतात. तिघांकडे ही मोठे फटके करण्याची क्षमता आहे आणि त्याद्वारे तेच प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.”
रसेल व पूरन हे वेस्ट इंडीजच्या टी२० संघाचे प्रमुख खेळाडू आहेत. तर, भारतासाठी सलामी देणारा रोहित संघाचा उपकर्णधार आहे.
आयपीएलमध्ये खेळताना दिसेल गेल
गेल आयपीएल २०२१ मध्ये पंजाब किंग्ससाठी खेळताना दिसेल. पंजाब संघ मजबूत दिसत असला तरी, वाढत्या वयामुळे गेलच्या कामगिरीत सातत्य नाही. नुकत्याच संपलेल्या अबुधाबी टी१० लीगमध्ये देखील तो एकच मोठी खेळी करू शकला होता. पंजाबसाठी त्याची बॅट तळपणे महत्त्वाचे आहे.
आयपीएल २०२१ मध्ये ख्रिस गेलची बॅट तळपली नाही तर, संघाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. गेलची आयपीएलमधील आकडेवारी शानदार आहे. गेलने एकूण १३२ आयपीएल सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ख्रिस गेलने ४१.१३ च्या जबरदस्त सरासरीने आणि १५०.११ च्या स्ट्राइक रेटने ४७७२ धावा केल्या आहेत. गेलच्या नावे आयपीएलमध्ये ३१ अर्धशतके आणि ६ शतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितचे टीकारांना सडेतोड उत्तर ‘प्रत्येक संघ मायदेशात आपल्या मजबुतीसह खेळत असतो, आम्हीही जेव्हा…’
भारतीय संघात निवड झाल्यानंतर सुर्यकुमारची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ही भावना…’
आयपीएल पुनरागमनाने पुजराच्या पंखात भरलं बळ; हंगाम संपताच खेळणार ही परदेशी टुर्नामेंट