रशियातील फिफा विश्वचषक स्पर्धा ही फुटबॉलच्या इतिहासातील सोशल मिडीया आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धा ठरली.
7.5 बिलीयन एवढे सहभाग फिफाच्या सगळ्या डिजीटल प्लटफॉर्मवरून नोंदवले गेले. ही स्पर्धा सुरू असताना 1.25 बिलीयन जणांनी सोशल मिडीयावर फिफाचे व्हिडीओ बघितले. तसेच डिजीटल प्लॅटफॉर्मवर 130 मिलीयनने वाढ झाली आहे.
580 मिलीयन एवढ्या संख्येने सोशल मिडीयावर या स्पर्धेची चर्चा झाली. ग्राहकांसाठी केलेल्या नवीन सुविधेमुळे फिफा फॉलोअर्सची संख्या सोशल मिडीयावर 128 मिलीयन एवढी झाली आहे.
याचबरोबर फिफाचे मोबाईल अॅप हे 128 देशांमध्ये खेळामधील पहिल्या क्रमांकाचे अॅप ठरले. यावेळी फिफाच्या 32 संघांच्या रिपोर्ट्सनी चाहत्यांसाठी या प्लटफॉर्मवर 16 वेगवेगळ्या भाषेतील मुद्दे आणि माहिती टाकली.
तसेच या स्पर्धेदरम्यान फिफाच्या अनेक प्लटफॉर्मवरून सुरू केलेल्या गेम्समध्ये 25 मिलीयन चाहत्यांनी सहभाग घेतला होता.
फिफा रशियाच्या अधिकृत अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्या 1 मिलीयनपेक्षा जास्त वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–क्रोएशियाने फ्रेंच फोटोग्राफरला देशात फिरण्यासाठी दिले आमंत्रण
–क्रोएशियाच्या या फुटबॉलपटूचा विश्वचषकाचे रौप्यपदक घेण्यास नकार