मॉस्को| रशियात सुरू असलेली 21वी फिफा विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने एका रशियन जाहिरात एजन्सीच्या प्रमुखाने आपल्या पत्नीचे चित्र 12-मजली उच्च भिंतीवर काढण्याची संधी वापरली.
ह्या चित्रात नोवाटेकचे आर्ट डायरेक्टर इवान पन्त्येलिवची बायको डारिया हिचा जिमकीट घातलेल्या स्वरूपातील प्रतिकृती आहे. तसेच तिच्यापाठीमागे निळे आकाश आणि उडणारे पक्षीही आहेत.
“ह्या चित्राने आम्ही रशियात फुटबॉल स्पर्धा बघायला येणाऱ्या परदेशी नागरिकांचे स्वागत करत आहोत”, असे विधान नोवाटेकच्या आर्ट डिरेक्टरने सोशल मीडियावर केले आहे.
हे चित्र मॉस्कोतील झुलबिनो येथील दर्शनी भिंतीवर काढले आहे. विश्वचषकातील भित्तिचित्रांचे सहआयोजन करणाऱ्या जनसंपर्क कमिटीपैकी ही एक आहे.
“हे खरे आहे की या चित्रातील मॉडेल माझी पत्नी आहे”, असे पन्त्येलिवने सांगितले.
“अशा कामासाठी प्रसिध्द व्यक्तींची आवश्यकता असते. मात्र यासाठी माझी पत्नी अधिक योग्य आहे”, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
ज्या दोघांनी हे चित्र काढले आहे त्यातील एक थाई ग्रॅफीटी कलाकार मयू बॉन आहे. ते रशियातील विश्वचषकासाठी सरकारी विभागाने आयोजित केलेल्या कामासाठी नोवाटेक आर्टमध्ये आले होते.
हे चित्राचे अनावरण विश्वचषक सुरू होण्याच्या एक दिवसआधी करण्यात आले.
“इवान नेहमीच म्हणतो की त्याचे समिक्षक हे केवळ ईर्ष्या करणारे आहेत. या प्रकरणात हे पूर्णपणे खरे आहे”, अशी टोचून बोलणारी पोस्ट गॅलरी दिग्दर्शक अॅना निस्ट्रातोवा यांनी फेसबुक पेजवर टाकली.
याला उत्तर देताना डारियाने म्हटले,”जर एखाद्या कलाकारास किंवा आयोजकला ‘सोनेरी रंगाचे केस असलेली आणि फुटबॉल पकडलेली रशियन मॉडेल’ हवी असेल,तर ती स्त्री ओळखीची वा अनोळखी असेल याच्याने काही फरक पडत नाही.”
अश्या चित्रांवर आधारित एक ट्रेलर तयार करण्यात आला. ज्यामध्ये हे चित्र दाखवले असून ते रशियन टीव्ही चॅनेल्सवर दाखवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या:
-फिफा विश्वचषक- तगड्या ब्राझीलला बेल्जियमकडून पराभवाचा झटका
-२१ व्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचणारा फ्रान्स पहिला संघ