भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांची रणधुमाळी सुरू आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर आता भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ चे सामने सुरू आहेत. या क्रिकेट स्पर्धेत इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) मैदान गाजवणारे काही युवा शिलेदारही सहभागी असून त्यांनी आपल्या धुव्वादार प्रदर्शनासह सर्वांचे लक्ष वेधले आहे. आयपीएल २०२१ मध्ये चौफेर फटकेबाजी करणारा चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड आणि कोलकाता नाईट रायडर्सचा वेंकटेश अय्यर, विजय हजारे ट्रॉफीतही शानदार फलंदाजी करत आहेत.
ऋतुराजचे सलग दुसरे शतक
चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर ऋतुराजची बॅट गेल्या काही महिन्यांपासून आग ओकताना दिसत आहे. ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या या अनकॅप्ड खेळाडूने आयपीएल २०२१ मधील आपला फॉर्म कायम राखत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत धावांचा रतीब घातला होता. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्र संघाचे नेतृत्त्व करताना त्याने सलग २ दिवसांत २ शतके झळकावली आहेत.
९ डिसेंबर रोजी छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात त्याने दीडशतकी खेळी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना छत्तीसगडने ७ बाद २७५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऋतुराजने कर्णधार खेळी केली. त्याने सलामीला फलंदाजी करताना १४३ चेंडूंमध्ये ५ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने नाबाद १५४ धावा फटकावल्या. त्याच्या या मॅरेथॉन खेळीमुळे महाराष्ट्र संघाने १८ चेंडू राखून आणि ८ विकेट्स राखून विजय मिळवला.
तत्पूर्वीच्या मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने ३२९ धावांचा पाठलाग करताना ११२ चेंडूंमध्ये १३६ धावा कुटल्या होत्या.
1⃣5⃣4⃣* Runs
1⃣4⃣3⃣ Balls
1⃣4⃣ Fours
5⃣ Sixes@Ruutu1331 was at his fluent best and scored his second successive hundred of #VijayHazareTrophy. 👏 👏 #CHHvMAHWatch his fantastic knock 🎥 🔽https://t.co/GcN3lB3gKC pic.twitter.com/wQ1GDPHeWf
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 9, 2021
वेंकटेशच्या अष्टपैलू प्रदर्शनाचा जलवा
ऋतुराजप्रमाणेच आयपीएल २०२१ मध्ये आपल्या अष्टपैलू प्रदर्शनाचा जलवा दाखवणाऱ्या वेंकटेशने विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात दमदार प्रदर्शन संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. ९ डिसेंबर रोजी केरळविरुद्धच्या सामन्यात मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या वेंकटेशने शतक ठोकले आणि याबरोबरच गोलंदाजीतही ३ विकेट्स काढल्या.
८४ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ७ चौकारांच्या साहाय्याने ११२ धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशने ३२९ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा बचाव ९ षटके गोलंदाजी करताना ५५ धावा देत ३ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘धन्यवाद कॅप्टन…’ नेटकऱ्यांनी कान उपटल्यानंतर बीसीसीआयला जाग, विराटच्या आभारासाठी केले खास ट्विट
‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणेसाठी देवाप्रमाणे धावून आला ‘हा’ दिग्गज! नाहीतर कसोटी कारकिर्द आली असती संपुष्टात
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडची कसोटीत वनडेप्रमाणे खेळी..! तेज तर्रार शतकासह बनला ‘विक्रमवीर’